60MP च्या शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह Motorola Edge 30 Pro भारतात लाँच; पहिल्याच सेलमध्ये 5000 रुपये ऑफ
By सिद्धेश जाधव | Published: February 25, 2022 11:42 AM2022-02-25T11:42:54+5:302022-02-25T11:43:14+5:30
Motorola Edge 30 Pro स्मार्टफोन भारतात 50MP Rear Camera, 60MP Selfie Camera आणि 8GB RAM सह लाँच झाला आहे.
Motorola नं आपला सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन भारतात Motorola Edge 30 Pro नावानं लाँच केला आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये चीनमध्ये आलेला हा फोन 24 फेब्रुवारीला भारतासह जगभरात लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 8GB RAM, 60MP सेल्फी कॅमेरा, 50MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर मिळतो.
Motorola Edge 30 Pro ची किंमत
कंपनीनं या स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट देशात सादर केला आहे. या फोनची किंमत 49,999 रुपये ठेवली आहे. हा मोबाईल 4 मार्चपासून Flipkart वरून विकत घेता येईल. या सेलमध्ये एसबीआय बँकेच्या कार्डचा वापर करून 5000 रुपयांचा डिस्काउंट मिळवू शकता. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी देण्यात येईल.
Motorola Edge 30 Pro चे स्पेसिफिकेशन्स
Motorola Edge 30 Pro स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेट, 576Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा मोटोरोला फोन Android 12 OS वर चालतो. यात बेसिक कनेक्टिव्हिटीसह सिक्योरिटीसही इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
Motorola Edge 30 Pro च्या स्पेक्समधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे या फोनमधील Qualcomm Snapdragon 8 Gen1 चिपसेट आहे. जो जुन्या क्वॉलकॉम प्रोसेसरपेक्षा कितीतरी वेगवान आहे. सोबत कंपनीनं ग्राफिक्ससाठी Adreno GPU दिला आहे. हा फोन 12GB पर्यंतच्या वेगवान LPDDR5 RAM सह बाजारात आला आहे. त्याचबरोबर 256GB पर्यंतची लेटेस्ट UFS 3.1 स्टोरेज मिळते.
फोटोग्राफीसाठी या शक्तिशाली फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 5MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP थर्ड सेन्सर देण्यात आला आहे. Motorola Edge 30 Pro मध्ये 60 मेगापिक्सलचा शानदार फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवर बॅकअपसाठी Motorola Edge 30 Pro मध्ये 4800mAh ची बॅटरी आणि 68W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.
हे देखील वाचा:
- रिचार्जच्या किंमतीत Smartphone; इतक्या स्वस्तात मिळतोय 6GB RAM असलेला Tecno Spark 8C
- ‘या’ शानदार Smartwatch वर गेम देखील खेळता येणार; किंमत 3 हजारांपेक्षा कमी
- घायाळ करणाऱ्या डिजाईनसह आला सर्वात पावरफुल Smartphone; इतकी आहे Oppo Find X5 आणि Oppo Find X5 Pro ची किंमत