12GB RAM आणि 60MP सेल्फी कॅमेऱ्यासह येतोय Motorola चा जबरा फोन; 5000mAh बॅटरीसह करणार एंट्री 

By सिद्धेश जाधव | Published: February 1, 2022 12:19 PM2022-02-01T12:19:42+5:302022-02-01T12:19:53+5:30

Motorola Edge 30 Pro India Launch: Motorola भारत आणि जागतिक बाजारात लवकरच 68W फास्ट चार्जिंग सपोर्ट व 5000mAh बॅटरीसह आपला नवीन स्मार्टफोन Motorola Edge 30 Pro लाँच करणार आहे.  

Motorola Edge 30 Pro To Launch In India And Global Market In February With 68w Fast Charging 5000mah Battery  | 12GB RAM आणि 60MP सेल्फी कॅमेऱ्यासह येतोय Motorola चा जबरा फोन; 5000mAh बॅटरीसह करणार एंट्री 

12GB RAM आणि 60MP सेल्फी कॅमेऱ्यासह येतोय Motorola चा जबरा फोन; 5000mAh बॅटरीसह करणार एंट्री 

Next

Motorola Edge 30 Pro लवकरच भारतात येणार आहे हा सादर केला जाणार आहे. तसेच हा फोन जागतिक बाजारात देखील दाखल केला जाईल. आता समोर आलेल्या डिजाइन आणि स्पेसिफिकेशनवरून हा Motorola Edge X30 चा रीब्रँडेड मॉडेल वाटत आहे. जो गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. असे झाल्यास हा फोन देखील शक्तिशाली Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरसह बाजारात येऊ शकतो.  

Motorola Edge 30 Pro India Launch 

Motorola Edge 30 Pro स्मार्टफोन फेब्रुवारी मध्ये ग्लोबल आणि भारतीय बाजारात लाँच करण्यात येईल. अचूक अशी तारीख मात्र 91mobiles च्या रिपोर्टमधून समोर आली नाही. हा स्मार्टफोन Motorola Edge X30 पेक्षा थोड्या वेगळ्या डिजाईनसह सादर केला जाईल.  

Moto Edge X30 5G चे स्पेसिफिकेशन्स    

Moto Edge X30 स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेट, 576Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 2400×1080 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा मोटोरोला फोन Android 12 OS वर आधारित MyUI 3.0 वर चालतो. यात बेसिक कनेक्टिव्हिटीसह सिक्योरिटीसही इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.    

Moto Edge X30 च्या स्पेक्समधील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे या फोनमधील Qualcomm Snapdragon 8 Gen1 चिपसेट आहे. जो जुन्या क्वॉलकॉम प्रोसेसरपेक्षा कितीतरी वेगवान आहे. सोबत कंपनीनं ग्राफिक्ससाठी Adreno GPU दिला आहे. हा फोन 12GB पर्यंतच्या वेगवान LPDDR5 RAM सह बाजारात आला आहे. त्याचबरोबर 256GB पर्यंतची लेटेस्ट UFS 3.1 स्टोरेज मिळते.    

फोटोग्राफीसाठी या शक्तिशाली फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सोबत 5MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP थर्ड सेन्सर देण्यात आला आहे. Moto Edge X30 मध्ये 60 मेगापिक्सलचा शानदार फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवर बॅकअपसाठी Moto Edge X30 मध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 68W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.   

हे देखील वाचा:

केएल राहुलच्या हातात दिसला Realme 9 Pro चा ब्लू कलर व्हेरिएंट; फोनमध्ये 64MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी

PF मधील पैसे काढायचे आहेत का? UMANG App वर काही क्लिक्समध्ये होईल काम

Web Title: Motorola Edge 30 Pro To Launch In India And Global Market In February With 68w Fast Charging 5000mah Battery 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.