60MP च्या भन्नाट Selfie कॅमेऱ्यासह Motorola चा नवीन फ्लॅगशिप फोन होऊ शकतो सादर
By सिद्धेश जाधव | Published: November 9, 2021 12:28 PM2021-11-09T12:28:09+5:302021-11-09T12:28:13+5:30
Motorola Edge 30 Ultra Launch: Motorola आपला आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन Edge 30 Ultra नावाने जागतिक बाजारात सादर करू शकते. ज्यात Qualcomm चा आगामी फ्लॅगशिप चिपसेट असेल.
मोटोरोला एका नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोनवर काम करत आहे. हा स्मार्टफोन Motorola Edge 30 Ultra नावाने बाजारात येईल, अशी माहिती TechnikNews ने दिली आहे. या डिवाइसचे ‘Rogue’ आणि ‘HiPhi’ हे दोन कोडनेम समोर आले आहेत. तसेच हा फोन XT2201 मॉडेल नंबरसह 3C सर्टिफिकेशन साईटवर दिसला आहे. चीनमध्ये हा डिवाइस Moto Edge X नावाने सादर केला जाईल. जागतिक बाजारात हा फोन Motorola Edge 30 Ultra नावाने 2022 च्या सुरुवातीला लाँच केला जाईल.
Motorola Edge 30 Ultra चे लीक स्पेसिफिकेशन्स
रिपोर्टनुसार, Motorola Edge 30 Ultra मध्ये 6.67-इंचाचा OLED डिस्प्ले मिळेल. हा डिस्प्ले Full HD+ रिजोल्यूशन, 144Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ ला सपोर्ट करेल. प्रोसेसिंगसाठी या डिवाइसमध्ये Qualcomm चा आगामी फ्लॅगशिप चिपसेट ज्याचा मॉडेल नंबर SM8450 आहे. हा चिपसेट Snapdragon 898 नावाने ओळखला जाईल.
आगामी मोटोरोला फोनमध्ये 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB पर्यंतची UFS 3.1 स्टोरेज देखील मिळेल. या फोनची खासियत म्हणजे 60 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल, जो 4K व्हिडीओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलचा OmniVision OV50A मुख्य सेन्सर, 50 मेगापिक्सलची Samsung JN150 अल्ट्रावाईड सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा OmniVision OV20B1B डेप्थ सेन्सर देण्यात येईल. पॉवर बॅकअपसाठी यात 5000mAh बॅटरी असेल, जी 68W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.