Snapdragon 870 प्रोसेसर, कमी किंमत; Motorola Edge S २६ जानेवारीला होणार लाँच
By जयदीप दाभोळकर | Published: January 20, 2021 03:56 PM2021-01-20T15:56:40+5:302021-01-20T16:02:55+5:30
जाणून घ्या काय असतील स्पेसिफिकेशन्स
Snapdragon 870 प्रोसेसर, कमी किंमत; Motorola Edge S २६ जानेवारीला होणार लाँच
Motorola Edge S will launch on January 26: मोटोरोलानं आपला अपकमिंग फोन Motorola Edge S हा २६ जानेवारी रोजी लाँच करण्याची तयारी केली आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 870 या चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. या प्रोसेसरचा सर्वाधिक क्लॉक स्पीड 3.2GHz इतका आहे. कंपनीनं आपल्या या मोबाईच्या लाँचची माहिती चिनी मायक्रोब्लॉगिंग साईट वीबोवरून केली आहे.
Qualcomm ने गेल्या वर्षी आपल्या स्नॅपड्रॅगन 865 हा प्रोसेसर लाँच केला होता. Qualcomm Snapdragon 870 हा त्याच प्रोसेसरचं अपग्रेडेड व्हर्जन आहे. या प्रोसेसरह कंपनीनं 5G सपोर्टही दिला आहे. युझर्सना उत्तम अनुभव मिळावा यासाठी क्वालकॉमनं 870 हा मिडरेंजसाठीचा प्रोसेसर लाँच केला आहे. दरम्यान, मोटोरोलाचा Motorola Edge S हा फोन 5G सपोर्टसह लाँच होणार का नाही याबाबत मात्र अद्याप कंपनीनं कोणतीही माहिती दिलेली नाही.
असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स
Motorola Edge S चे काही स्पेसिफिकेशन्स यापूर्वीच लिक झाले आहेत. तसंच यामध्ये कोणता कॅमेरा वापरण्यात आला आहे याची माहिती देखील समोर आली होती. या लिकनुसार या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा Full HD+ डिस्प्ले देण्यात येणार आहे. याचा रिफ्रेश रेटही 105 हर्ट्झ असू शकतो. या डिस्प्लेचं रिझॉल्युशन 2520*1080 पिक्सेल इतकं आहे. एका अन्य लिकनुसार हा फोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो. यापैकी एक 8 जीबी + 128 जीबी तर दुसरा व्हेरिअंटमध्ये 12 जीबी + २५६ जीबी स्टोरेजसह लाँच होऊ शकते. तसंच यामध्ये 5000 MAh ची बॅटरी देण्यात आली आहे. परंतु याला फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे अथवा नाही याबाबत माहिती समोर आली नाही.
कसा असू शकतो कॅमेरा ?
कॅमेऱ्याबाबत सांगायचं झालं तर स्मार्टफोमध्ये मागील बाजून ट्रिपल कॅमेरा सेटअप दिलं जाणार आहे. तसंच याचा प्रायमरी कॅमेरा हा 64 मेगापिक्सेलचा असू शकतो. यासोबतच 16 मेगापिक्सेसची अल्ट्रा व्हाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी यात ड्युएल फ्रन्ट कॅमेरा सेटअप दिलं गेलं आहे. यातील एक कॅमेरा 16 मेगापिक्सेल तर दुसरा कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा असणार आहे. 26 जानेवारी रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजता लाँचिंग सेरेमनी पार पडणार आहे. या मोबाईल किंमत किती असेल याचा उलगडा कंपनी त्याच वेळी करणार आहे.