सॅमसंग-शाओमी नव्हे तर ‘ही’ कंपनी आणणार 194MP कॅमेरा आणि 125W फास्ट चार्जिंगसह नवीन फोन 

By सिद्धेश जाधव | Published: February 19, 2022 03:51 PM2022-02-19T15:51:04+5:302022-02-19T15:51:37+5:30

Motorola लवकरच 194MP कॅमेरा आणि 125W असलेला Frontier स्मार्टफोन लाँच करणार आहे. अन्य स्पेक्स देखील जबरदस्त असतील.  

Motorola frontier with 194mp back 60mp selfie camera and 125w charging render leak check features  | सॅमसंग-शाओमी नव्हे तर ‘ही’ कंपनी आणणार 194MP कॅमेरा आणि 125W फास्ट चार्जिंगसह नवीन फोन 

सॅमसंग-शाओमी नव्हे तर ‘ही’ कंपनी आणणार 194MP कॅमेरा आणि 125W फास्ट चार्जिंगसह नवीन फोन 

Next

Motorola लवकरच 200MP कॅमेरा असलेला फोन सादर करणार आहे, अशी बातमी गेल्यावर्षी डिसेंबरच्या आधीपासून येत आहे. रिपोर्टनुसार, या फोनमध्ये Samsung चा 200MP रिजोल्यूशन असलेला नवीन ISOCELL HP1 सेन्सर देण्यात येईल. कंपनी या फोनचे नाव Motorola Frontier ठेऊ शकते. परंतु आता एका नवीन रिपोर्टमधून या डिवाइसच्या 200MP ऐवजी 194MP च्या कॅमेऱ्याची माहिती मिळाली आहे.  

टिपस्टर Evan Blass नं Motorola Frontier संबंधित नवीन माहिती आणि रेंडर शेयर केले आहेत. हा फोन नवीन 1 किंवा 1.5 इंचाच्या 194MP प्रायमरी सेन्सरसह बाजारात येऊ शकतो. सोबत अन्य दोन सेन्सर मिळतील. या आगामी Motorola चा प्रायमरी सेन्सर OIS (ऑप्टिकल इमेज स्टेब्लाइजेशन) ला सपोर्ट करेल. फोनच्या तळाला USB Type C, SIM कार्ड ट्रे आणि स्पिकर देण्यात येईल.  

Motorola Frontier संभाव्य स्पेक्स  

या आगामी मोटोरोला फोनमध्ये 6.67 इंचाचा फुलएचडी+ कर्व्ड अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात येईल. हा डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. यात Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर आणि 12GB पर्यंत RAM मिळू शकतो. सोबत 256GB पर्यंतची UFS 3.1 स्टोरेज मिळू शकते.  

ट्रिपल कॅमेरा सेटअपमध्ये 194MP चा प्रायमरी सेन्सर, 50MP चा अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 12MP चा ट्रिपल कॅमेरा मिळेल. सोबत 60MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालेल. या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 50W वायरलेस आणि 125W फास्ट चार्जिंग सपोर्टसह दिली जाऊ शकते. 

हे देखील वाचा:

Web Title: Motorola frontier with 194mp back 60mp selfie camera and 125w charging render leak check features 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.