5000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह Moto G50 5G बाजारात दाखल; जाणून घ्या किंमत
By सिद्धेश जाधव | Published: August 25, 2021 03:45 PM2021-08-25T15:45:26+5:302021-08-25T15:45:39+5:30
Motorola G50 5G launch: मोटोरोलाने आज जागतिक बाजारात ‘जी सीरीज’ चा विस्तार करत Moto G50 5G स्मार्टफोन सादर केला आहे.
Motorola नुकतीच आपली ‘एज 20’ सीरिज भारतासह जगभरात सादर केली होती. या सीरिजमध्ये कंपनीने 4 स्मार्टफोन सादर केले होते. फोन लाँच करण्याचा सपाटा सुरु ठेवत कंपनीने महिनाभरात आठवा स्मार्टफोन आता सादर केला आहे. मोटोरोलाने आज जागतिक बाजारात ‘जी सीरीज’ चा विस्तार करत Moto G50 5G स्मार्टफोन सादर केला आहे.
Motorola G50 5G चे स्पेसिफिकेशन्स
Motorola G50 5G स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा डिमेनसिटी 700 चिपसेट देण्यात आला आहे. जो एक 5G चिसर्पसेट आहे. त्याचबरोबर कंपनीने या अँड्रॉइड 11 आधारित स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज दिली आहे. ही स्टोरेज मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.
या नवीन मोटोरोला फोनमध्ये 6.5 इंचाचा मॅक्सविजन एचडी+ डिस्प्ले मिळतो. या डिस्प्लेचा अस्पेक्ट रेशियो 20:9 , रिजोल्यूशन 1600 x 720 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 90हर्ट्ज आहे. हा एक वॉटरड्रॉप नॉच असलेला आयपीएस एलसीडी पॅनल आहे.
Motorola G50 5G च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. तसेच हा मोटोरोला फोन 13 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनमधीलवाली 5,000एमएएचची बॅटरीला 10वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
Motorola G50 5G फोनची किंमत
Motorola G50 5G स्मार्टफोन सध्या आस्ट्रेलियामध्ये AUD 399 किंमतीत सादर करण्यात आला आहे. ही किंमत सुमारे 21,400 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा भारतासह जगभरात कधी उपलब्ध होईल याची कोणतीही माहिती कंपनीने दिली नाही.