Motorola ची कमाल कामगिरी! 11 हजारांच्या आत आयफोन सारखा Smartphone 

By सिद्धेश जाधव | Published: April 8, 2022 01:00 PM2022-04-08T13:00:59+5:302022-04-08T13:01:37+5:30

Motorola Moto G22 स्मार्टफोन भारतात 4GB RAM, 5000mAh बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे.  

Motorola Launches Moto G22 On Flipkart At Rs 10999 Check Details  | Motorola ची कमाल कामगिरी! 11 हजारांच्या आत आयफोन सारखा Smartphone 

Motorola ची कमाल कामगिरी! 11 हजारांच्या आत आयफोन सारखा Smartphone 

googlenewsNext

Motorola नं आज आपला नवीन बजेट फ्रेंडली स्मार्टफोन Moto G22 लाँच केला आहे. या फोनची किंमत कमी आहे परंतु याचा डिस्प्ले आयफोन सारखा दिसतो. कंपनीनं यात अ‍ॅप्पल आयफोन सारखी फ्लॅट एज डिजाईन दिली आहे. त्याचबरोबर 4GB RAM, 5000mAh बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट आणि 50MP कॅमेरा, असे स्पेसिफिकेशन्स देखील मिळतात.  

Moto G22 ची किंमत 

Moto G22 स्मार्टफोन स्टायलिश डिजाईनसह 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. कंपनीनं फोनचा एकच व्हेरिएंट सादर केला आहे, ज्याची किंमत फक्त 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे. Moto G22 स्मार्टफोन 13 एप्रिलला दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवरून तीन रंगात विकत घेता येईल.  

Motorola Moto G22 चे स्पेसिफिकेशन्स  

मोटो जी22 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. जो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टम कंपनीनं दिली आहे. प्रोसेसिंगसाठी ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकच्या हीलियो जी37 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.  

Motorola Moto G22 मध्ये फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि दोन 2 मेगापिक्सलचे सेन्सर देण्यात आले आहेत. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह रियर फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते. यातील 5,000एमएएच बॅटरी 20वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्टसह पावर बॅकअप देते. 

Web Title: Motorola Launches Moto G22 On Flipkart At Rs 10999 Check Details 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.