मोटोरोलाची मोटो ई ४ प्लसची नवीन आवृत्ती बाजारात दाखल

By शेखर पाटील | Published: September 21, 2017 02:54 PM2017-09-21T14:54:09+5:302017-09-21T14:55:27+5:30

मोटोरोला कंपनीने आपल्या मोटो ई ४ प्लस या स्मार्टफोनची ऑक्सफर्ड ब्ल्यू रंगातील नवीन आवृत्ती ग्राहकांना ९,४९९ रूपये मूल्यात लाँच केले आहे.

Motorola launches new version of Moto E4 Plus | मोटोरोलाची मोटो ई ४ प्लसची नवीन आवृत्ती बाजारात दाखल

मोटोरोलाची मोटो ई ४ प्लसची नवीन आवृत्ती बाजारात दाखल

Next
ठळक मुद्देमोटो ई ४ प्लस या स्मार्टफोनची मूळ आवृत्ती ९,९९९ रूपये मूल्यात सादर करण्यात आली होतीहे मॉडेल आयर्न ग्रे आणि फाईन गोल्ड या रंगांच्या पर्यायात उपलब्ध करण्यात आले होतेयात आता ऑक्सफर्ड ब्ल्यू रंगाची भर पडणार आहे

मोटोरोला कंपनीने आपल्या मोटो ई ४ प्लस या स्मार्टफोनची ऑक्सफर्ड ब्ल्यू रंगातील नवीन आवृत्ती ग्राहकांना ९,४९९ रूपये मूल्यात लाँच केले आहे.

मोटो ई ४ प्लस या स्मार्टफोनची मूळ आवृत्ती ९,९९९ रूपये मूल्यात सादर करण्यात आली होती. हे मॉडेल आयर्न ग्रे आणि फाईन गोल्ड या रंगांच्या पर्यायात उपलब्ध करण्यात आले होते. यात आता ऑक्सफर्ड ब्ल्यू रंगाची भर पडणार आहे. मोटो ई ४ प्लस स्मार्टफोनची खासियत म्हणजे यातील तब्बल ५,००० मिलीअँपिअर प्रति-तास इतक्या क्षमतेची बॅटरी असेल. यात रॅपीड चार्जरची सुविधादेखील असेल. यात मागील बाजूस फिंगरप्रिंट स्कॅनरदेखील प्रदान करण्यात आले असून फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क तसेच ब्ल्यु-टुथ, जीपीएस, वाय-फाय, मायक्रो-युएसबी आदींचा समावेश असेल.

मोटो ई ४ प्लस या मॉडेलमध्ये ५.५ इंच आकारमानाचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स म्हणजेच एचडी क्षमतेचा २.५ ग्लास वक्राकार डिस्प्ले असेल. क्वॉड-कोअर स्नॅपड्रॅगन ४२७ प्रोसेसर असणार्‍या या स्मार्टफोनची रॅम तीन जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज ३२ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने वाढविण्याची सुविधा आहे. या स्मार्टफोनमध्ये एलईडी फ्लॅशयुक्त १३ मेगापिक्सल्सचा कॅमेरा तर ५ मेगापिक्सल्सचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट या अद्ययावत आवृत्तीवर चालणारे आहे.

Web Title: Motorola launches new version of Moto E4 Plus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.