200MP चा कॅमेरा असलेला स्मार्टफोन आणण्याचा ‘विडा’ Motorola उचलण्याची शक्यता; फ्लॅगशिप फोन Frontier 22 करणार धमाकेदार एंट्री

By सिद्धेश जाधव | Published: January 27, 2022 04:10 PM2022-01-27T16:10:55+5:302022-01-27T16:11:26+5:30

200MP Camera Phone: मोटोरोलाच्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनचं कोडनेम Frontier 22 आहे. या मोटोरोला स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 “Plus” चिपसेटसह बाजारात येईल.

Motorola May launch Next Flagship Smartphone Frontier 22 With 200mp Camera And Snapdragon 8 Gen 1   | 200MP चा कॅमेरा असलेला स्मार्टफोन आणण्याचा ‘विडा’ Motorola उचलण्याची शक्यता; फ्लॅगशिप फोन Frontier 22 करणार धमाकेदार एंट्री

(सौजन्य: Winfuture)

Next

Motorola नं सध्या नवीन विक्रम प्रस्थापित करण्याचं मनावर घेतल्याचं दिसत आहे. कंपनीनं गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये जगातील पहिला क्वालकॉम Snapdragon 8 Gen 1 SoC असलेला स्मार्टफोन लाँच केला होता. चीनमध्ये Moto X30 नावानं आलेला हा फोन जागतिक बाजारात Edge 30 Pro नावानं दाखल होऊ शकतो. परंतु आता कंपनी 200MP चा कॅमेरा असलेला जगातील पहिला स्मार्टफोन सादर करून नवीन विक्रम आपल्या नावे करू शकते.  

एका नव्या मीडिया रिपोर्टमधून मोटोरोलाच्या नव्या फ्लॅगशिप स्मार्टफोनची माहिती आली आहे. मोटोरोलाच्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनचं कोडनेम Frontier 22 आहे. या मोटोरोला स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 “Plus” चिपसेटसह बाजारात येईल, जो अजून लाँच झालेला नाही. परंतु हा क्वालकॉमच्या Snapdragon 8 Gen 1 चिपसेटचा अपग्रेड व्हर्जन असू शकतो.  

200MP Camera Phone 

WinFuture नं मोटोरोलाच्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोनचे डिजाइन रेंडर शेयर केले आहेत. या रेंडर्सवरून स्मार्टफोनच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे. तसेच रिपोर्टमधून स्पेक्सची माहिती देखील मिळाली आहे. Motorola च्या या फोनमध्ये 6.67-इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा डिस्प्ले Full HD+ रिजोल्यूशन, 144Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ सपोर्ट मिळेल. मोटोरोलाचा हा दमदार स्मार्टफोन जुलै 2022 मध्ये लाँच केला जाऊ शकतो. 

या स्मार्टफोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आकर्षण बिंदू असेल कारण यात OIS सपोर्टसह 200MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. सोबत 50MP चा अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 2x झूम सपोर्टसह 12MP चा टेलीफोटो सेन्सर दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये Moto X30 प्रमाणे 60MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.  

या मोटोरोला स्मार्टफोनमधील Snapdragon 8 Gen 1 Plus SoC अजून एक महत्वाचा घटक असेल. सोबत 12GB पर्यंत RAM आणि 256GB स्टोरेज देखील देण्यात येईल. मोटोरोलाचा हा स्मार्टफोन Android 12 वर चालेल. यातील 4500mAh ची बॅटरी 125W फास्ट चार्जिंगसह सादर केली जाऊ शकते. सोबत 30W किंवा 50W वायरलेस चार्जिंग मिळू शकते.  

हे देखील वाचा:

Web Title: Motorola May launch Next Flagship Smartphone Frontier 22 With 200mp Camera And Snapdragon 8 Gen 1  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.