अॅप्पल-सॅमसंगसह सर्वांना फुटला घाम! 200MP कॅमेरा व 12GB रॅमसह येतो मोटो फोन; लाँच डेट समजली
By सिद्धेश जाधव | Published: May 5, 2022 07:32 PM2022-05-05T19:32:32+5:302022-05-05T19:32:41+5:30
Motorola नं 10 मेला चीनमध्ये एक लाँच इव्हेंटचं आयोजन केलं आहे. या इव्हेंटमधून Moto G82 स्मार्टफोनसह 200MP चा कॅमेरा असलेला Motorola Frontier लाँच केला जाऊ शकतो.
Motorola येत्या 10 मेला चीनमध्ये एक इव्हेंट आयोजित करणार आहे. हा इव्हेंट भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजून 30 मिनीटांनी सुरु होईल. या इव्हेंटमधून कंपनी कोणता स्मार्टफोन लाँच करणार आहे, हे सांगण्यात आलं नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार कंपनी Moto G82 आणि कोडनेम Frontier असलेला फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करू शकते. एक मिडरेंज डिवाइस असेल तर दुसरा 200MP कॅमेऱ्यासह येणारा जगातील पहिला डिवाइस असू शकतो.
मोटोरोला फ्रंटियरचे संभाव्य स्पेक्स
टीजर्सनुसार Motorola Frontier मध्ये 6.7-इंचाचा फुल एचडी+ ओएलईडी डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेटसह मिळेल. याचे लक्षवेधी फीचर म्हणजे कॅमेरा सेगमेंट असेल. फोनमध्ये ट्रिपल रीयर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 200MP चा मुख्य सेन्सर, 50MP चा अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि 12MP ची पोर्टेट किंवा टेलीफोटो लेन्स मिळेल. तर फ्रंटला 60MP चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.
हा स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8 जेन 1+ SoC सह बाजारात येऊ शकतो. सोबत 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळेल. Motorola Frontier मध्ये 4,500mAh ची बॅटरी 125W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50W वायरलेस चार्जिंगसह मिळू शकते. लिक्सनुसार हा फोन मे 2022 मध्ये ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो.
Moto G82 मध्ये हे फीचर्स मिळतील
Moto G82 स्मार्टफोन TENAA आणि 3C या सर्टिफिकेशन साईट्सवर दिसला आहे. त्यानुसार यात 120Hz रिफ्रेश रेटसह 6.55-इंचाचा FHD+ pOLED डिस्प्ले मिळू शकतो. यात स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात येईल. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 128GB इनबिल्ट स्टोरेज मिळू शकते. या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सल मुख्य सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. तर फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असेल. हा फोन 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 5000mAh च्या बॅटरीसह बाजारात येऊ शकतो.