परवडणाऱ्या किंमतीती आला Moto E30; मिळणार 48MP Camera आणि 5000mAh Battery
By सिद्धेश जाधव | Published: November 6, 2021 05:55 PM2021-11-06T17:55:05+5:302021-11-06T17:55:11+5:30
Budget Phone Moto E30: मोटोरोलाने आपला बजेट फ्रेंडली स्मार्टफोन Moto E30 जागतिक बाजारात उतरवला आहे. या फोनमध्ये 2GB RAM, 48MP Camera आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
मोटोरोलाने आपल्या E सीरीजचा विस्तार करत नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. नवीन Moto E30 फोन कंपनीने दक्षिण अमेरिकन देशांमध्ये सादर केला आहे. कोलंबियामध्ये या फोनची किंमत 529,900 COP ठेवण्यात आली आहे. ही किंमत सुमारे 10,200 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. ब्लू आणि अर्बन ग्रे कलरमध्ये सादर झालेला हा फोन लवकरच जागतिक बाजारात उपलब्ध होऊ शकतो.
Moto E30 चे स्पेसिफिकेशन
Moto E30 मध्ये कंपनीने 6.5 इंचाचा एचडी+ मॅक्स विजन आयपीएस डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 20:9 अस्पेक्ट रेशियो आणि 90Hz रिफ्रेश रेटसह बाजारात आला आहे. या फोनला ऑक्टा-कोर Unisoc T700 SoC चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. त्याचबरोबर 2GB RAM आणि 32GB इंटरनल स्टोरेज मिळते. हा फोन s Android 11 (गो एडिशन) वर चालतो.
या ड्युअल सिम फोनमध्ये 4G LTE, वाय-फाय 802.11 a/b/g/n, ब्लूटूथ 5, जीपीएस/A-GPS, यूएसबी टाइप-C आणि 3.5mm हेडफोन जॅक असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन देण्यात आले आहेत. तसेच सिक्योरिटीसाठी यात रियर माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. हा IP52 डस्ट आणि वॉटर रेजिस्टन्ससह येणारा स्मार्टफोन आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. या फोनमाचीला 5000mAh ची बॅटरी 10 वॉट चार्जिंगला सपोर्ट करते. हा हँडसेट सिंगल चार्जवर 40 तासांचा बॅकअप देऊ शकतो, असा दावा कंपनीने केला आहे.