14,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत लाँच होऊ शकतो Moto E40; स्पेसिफिकेशन्ससह वेबसाईटवर लिस्ट
By सिद्धेश जाधव | Published: October 6, 2021 07:10 PM2021-10-06T19:10:01+5:302021-10-06T19:10:05+5:30
Upcoming Budget Smartphone Moto E40: Motorola Moto E40 स्मार्टफोन रोमानियाच्या एका रिटेलरच्या साईटवर लिस्ट करण्यात आला आहे. इथून specifications आणि price ची माहिती मिळाली आहे.
मोटोरोलाच्या आगामी स्मार्टफोन Moto G31 ची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली आहे. आता अजून एका बजेट फोनची माहिती देखील उपलब्ध झाली आहे. एका रिटेलरने Moto E40 चे स्पेसिफिकेशन्स लिस्ट केले आहेत. त्यामुळे या फोनची बऱ्यापैकी माहिती मिळाली आहे. विशेष म्हणजे या लिस्टिंगमधून मोटोरोलाच्या आगामी फोनची किंमत देखील समजली आहे.
किंमत
Motorola Moto E40 स्मार्टफोन रोमानियाच्या एका रिटेलरच्या साईटवर दिसला आहे. या वेबसाईटवर मोटोरोला फोनची किंमत 779 Lei एवढी दखवण्यात आली आहे. ही किंमत 13,600 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. लिस्टिंगमधून Gold आणि Gray या दोन रंगांची माहिती मिळाली आहे. या लीकमुळे Moto E40 चा जागतिक लाँच निश्चित झाला आहे. त्यानंतर काही दिवसांनी हा फोन भारतीय बाजारात देखील दाखल होऊ शकतो.
स्पेसिफिकेशन्स
लिस्टिंगनुसार, मोटोरोला फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले दिला जाईल. हा डिस्प्ले 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन आणि 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये Unisoc T700 चिपसेट दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल स्टोरेज देखील लिस्ट करण्यात आली आहे.
फोटोग्राफीसाठी मोटो ई40 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. यात 48 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचे दोन सेन्सर दिले जाऊ शकतात. या फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. बेसिक कनेक्टिव्हिटीसह सिक्योरिटीसाठी या फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो. पॉवर बॅकअपसाठी या मोटोरोला फोनमध्ये 4,000एमएएचची बॅटरी दिली जाईल.