मिडबजेटमध्ये मोटोरोलाने दाखवली पॉवर; 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Moto G Power 2022 लाँच  

By सिद्धेश जाधव | Published: November 18, 2021 11:49 AM2021-11-18T11:49:30+5:302021-11-18T11:50:06+5:30

Moto G Power (2022) Price Launch: Moto G Power (2022) स्मार्टफोनमध्ये 50MP Camera, 5000mAh Battery आणि 4GB RAM असे स्पेक्स मिळतात.  

motorola Moto G Power 2022 official with 50MP Camera 5000mAh Battery Helio G37 specs and price  | मिडबजेटमध्ये मोटोरोलाने दाखवली पॉवर; 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Moto G Power 2022 लाँच  

मिडबजेटमध्ये मोटोरोलाने दाखवली पॉवर; 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Moto G Power 2022 लाँच  

Next

Motorola ने आपल्या ‘जी’ सीरीज अंतर्गत Moto G Power (2022) नावाचा नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. हा फोन सध्या अमेरिकेत सादर करण्यात आला आहे. फोनमध्ये कंपनीने MediaTek Helio G37 चिपसेटची ताकद दिली आहे. त्याचबरोबर Moto G Power (2022) स्मार्टफोनमध्ये 50MP Camera, 5000mAh Battery आणि 4GB RAM असे स्पेक्स मिळतात.  

Moto G Power (2022) चे स्पेसिफिकेशन्स 

Moto G Power (2022) मध्ये प्रोसेसिंगसाठी ऑक्टकोर प्रोसेसरसह MediaTek Helio G37 चिपसेट देण्यात आला आहे. त्याचबरोबर कंपनीने 4GB RAM आणि 128GB पर्यंतची स्टोरेज दिली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. या मोटोरोला फोनमध्ये हायपरइंजिन टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे, जी लॅग फ्री आणि स्मूद गेमिंग अनुभव देण्यासाठी मदत करते. मोटो जी पॉवर 2022 हा एक अँड्रॉइड 11 आधारित फोन आहे.  

Moto G Power (2022) मध्ये 720 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.5 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा आयपीएस एलसीडी पॅनल 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या मोबाईलमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवर बॅकअपसाठी या मोटोरोला फोनमध्ये 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करणारी 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. 

Moto G Power (2022) ची किंमत 

Moto G Power (2022) चे दोन व्हेरिएंट ग्राहकांच्या भेटीला आले आहेत. फोनच्या 4 जीबी रॅम  आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत 199 डॉलर्स (अंदाजे 14,700 रुपये) आहे. तर 4 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसाठी 249 डॉलर्स (अंदाजे 18,500 रुपये) द्यावे लागतील.  

Web Title: motorola Moto G Power 2022 official with 50MP Camera 5000mAh Battery Helio G37 specs and price 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.