Moto G Power (2022) चे स्पेसिफिकेशन्स आले समोर; परवडणाऱ्या किंमतीत होऊ शकतो लाँच
By सिद्धेश जाधव | Published: November 11, 2021 03:07 PM2021-11-11T15:07:28+5:302021-11-11T16:44:49+5:30
New Motorola Phone Moto G Power (2022): Moto G Power (2022) 10 नोव्हेंबरला बेंचमार्किंग साईट गिकबेंचवर दिसला होता. या लिस्टिंगमधून या फोनच्या काही स्पेक्सची माहिती मिळाली आहे.
मोटोरोला आपल्या जी सीरिजचा विस्तार करण्याची तयारी करत आहे. Moto G10 Power नंतर आता Moto G Power (2022) ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. हा परवडणाऱ्या किंमतीत येणारा स्मार्टफोन असेल जो लवकरच लाँच केला जाऊ शकतो. आता हा आगामी मोटोरोला फोन काही स्पेसिफिकेशन्ससह बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे.
Moto G Power (2022) कधी लाँच होईल, हे मात्र कंपनीने सांगितले नाही. परंतु आता हो बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे. या लिस्टिंगमधून या मोटोरोला फोनचे नाव मोटो जी पॉवर (2022) असेल असे सांगण्यात आले आहे. या डिवाइसला गिकबेंचच्या सिंगल-कोर टेस्टमध्ये 165 आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 1103 स्कोर मिळाला आहे. या लिस्टिंगमुळे या फोनचा लाँच नजीक असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
Moto G Power (2022) चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
Moto G Power (2022) स्मार्टफोन अँड्रॉइड 11 ओएसवर चालेल. या फोनमध्ये 2.30गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला आक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. या फोनमधील प्रोसेसरची थेट माहिती मिळाली नाही. परंतु लिस्टिंगमधील कोडनेमनुसार हा फोन मीडियाटेक हीलियो जी35 चिपसेटसह बाजारात येईल. गीकबेंचनुसार हा मोटोरोला फोन 4 जीबी रॅमसह बाजारात येईल. परंतु कंपनी या डिवाइसचे अजून व्हेरिएंट बाजारात आणू शकते.