कमी किंमतीत शानदार मोटोरोला फोन सादर; तब्बल 2 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह आला Moto G Pure
By सिद्धेश जाधव | Published: October 8, 2021 11:53 AM2021-10-08T11:53:04+5:302021-10-08T11:53:10+5:30
Budget Motorola phone Moto G Pure price: मोटोरोलाने स्वस्त स्मार्टफोन Moto G Pure आंतरराष्ट्रीय बाजारात लाँच केला आहे. या फोनची किंमत 160 डॉलर म्हणजे 11 हजार भारतीय रुपयांच्या आसपास आहे.
मोटोरोला सध्या लागोपाठ स्मार्टफोन्स सादर करत आहे. काही दिवसांपूर्वी भारतात मिडरेंजमध्ये कंपनीने दमदार फोन्स सादर केले होते. आता कंपनीने जागतिक बाजारात एक बजेट फ्रेंडली डिवाइस सादर केला आहे. मोटोरोलाने स्वस्त स्मार्टफोन Moto G Pure आंतरराष्ट्रीय बाजारात लाँच केला आहे. या फोनची किंमत 160 डॉलर म्हणजे 11 हजार भारतीय रुपयांच्या आसपास आहे.
Moto G Pure चे स्पेसिफिकेशन्स
मोटोरोला मोटो जी प्योर मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ मॅक्स विजन एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हे 20:9 अस्पेक्ट रेशियो असलेला डिस्प्ले 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. कंपनीने यात मीडियाटेक Helio G25 चिपसेटचा वापर केला आहे. हा डिवाइस अँड्रॉइड 11 आधारित माययूक्सवर चालतो. यात 3GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, ही मेमरी मायक्रोएसडी कार्डने 512GB पर्यंत वाढवता येते.
हा फोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. ज्यात एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा मोटोरोला फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटी आणि सिक्योरिटीसह हा फोन 4,000mAh च्या बॅटरीसह बाजारात आला आहे. ही बॅटरी 2 दिवसांचा बॅटरी बॅकअप देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.