शाओमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज; कमी किंमतीत दमदार Moto G Pure होऊ शकतो सादर  

By सिद्धेश जाधव | Published: September 6, 2021 06:56 PM2021-09-06T18:56:42+5:302021-09-06T18:59:21+5:30

Motorola Moto G Pure: Motorola G Pure स्मार्टफोनला गीकबेंचच्या सिंगलकोर टेस्टमध्ये 135 तर मल्टीकोर टेस्टमध्ये 501 पॉईंट्स मिळाले आहेत.

Motorola moto g pure smartphone specifications on geekbench  | शाओमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज; कमी किंमतीत दमदार Moto G Pure होऊ शकतो सादर  

शाओमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी Motorola सज्ज; कमी किंमतीत दमदार Moto G Pure होऊ शकतो सादर  

Next
ठळक मुद्देMotorola G Pure स्मार्टफोनला गीकबेंचच्या सिंगलकोर टेस्टमध्ये 135 तर मल्टीकोर टेस्टमध्ये 501 पॉईंट्स मिळाले आहेत.Motorola Moto G Pure स्मार्टफोन मॉडेल नंबर XT2163-4 सह REL Canada सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट करण्यात आला होता.

Motorola चा नवीन बजेट स्मार्टफोन Moto G Pure लवकरच बाजारात सादर केला जाऊ शकतो. हा फोन नुकताच बेंचमार्किंग साईट Geekbench लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमधून या मोटोरोलास्मार्टफोनच्या चिपसेटची माहिती माहिती मिळाली आहे. हा फोन Helio G25 SoC सह बाजारात दाखल होऊ शकतो. याआधी या फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती FCC, Wi-Fi Alliance TUV, आणि REL Canada सर्टिफिकेशन साइटवरील लिस्टिंगमधून समोर आली होती.  

Motorola Moto G Pure  

Motorola G Pure स्मार्टफोनला गीकबेंचच्या सिंगलकोर टेस्टमध्ये 135 तर मल्टीकोर टेस्टमध्ये 501 पॉईंट्स मिळाले आहेत. गिकबेंचनुसार या फोनमध्ये 2GHz स्पीड असलेला मीडियाटेकचा Helio G25 प्रोसेसर मिळेल. तसेच या 3GB RAM आणि Android 11 ऑपरेटिंग सिस्टम मिळू शकते. TUV सर्टिफिकेशननुसार या फोनमधील 4000mAh ची बॅटरी 10W चार्जिंगला सपोर्ट करेल. 

Motorola Moto G Pure स्मार्टफोन मॉडेल नंबर XT2163-4 सह REL Canada सर्टिफिकेशन साईटवर लिस्ट करण्यात आला होता. तर Wi-Fi Alliance सर्टिफिकेशनमधून Android 11 ओएसला दुजोरा मिळाला आहे. हा फोन बाजारात कधी येईल हे मात्र अजून समजले नाही. तसेच मोटोरोलाने देखील Moto G Pure च्या लाँचबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु आतापर्यंत समोर आलेले स्पेक्स पाहता हा एक बजेट स्मार्टफोन असेल हे निश्चित.  

Web Title: Motorola moto g pure smartphone specifications on geekbench 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.