15 हजारांच्या आत Motorola ची कमाल; जबरदस्त स्पेसिफिकेशन्ससह Moto G22 लाँच  

By सिद्धेश जाधव | Published: March 4, 2022 12:58 PM2022-03-04T12:58:01+5:302022-03-05T12:17:18+5:30

Budget Phone Motorola Moto G22: Motorola Moto G22 स्मार्टफोन 4GB RAM, MediaTek Helio G37, 50MP Camera आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो.

Motorola Moto G22 Launched With 50mp Camera 5000mAh Battery In Low Budget Know Price Specifications  | 15 हजारांच्या आत Motorola ची कमाल; जबरदस्त स्पेसिफिकेशन्ससह Moto G22 लाँच  

15 हजारांच्या आत Motorola ची कमाल; जबरदस्त स्पेसिफिकेशन्ससह Moto G22 लाँच  

Next

Motorola चा भारतातील सर्वात स्वस्त फ्लॅगशिप स्मार्टफोन Motorola Edge 30 Pro आजपासून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. तर तिकडे युरोपियन बाजारात कंपनीनं एक लो बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. हा डिवाइस कंपनीनं आपल्या ‘जी’ सीरीजमध्ये Moto G22 नावानं उतरवला आहे. युरोपियन बाजारात आलेला हा फोन 4GB RAM, MediaTek Helio G37, 50MP Camera आणि 5,000mAh Battery सारख्या स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो.  

Moto G22 किंमत जागतिक बाजारात 169.99 यूरो ठेवण्यात आली आहे. ही किंमत भारतीय चालनानुसार 14,200 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन Iceberg Blue, Cosmic Black, Mint Green आणि Pearl White कलरमध्ये आला आहे. या फोनच्या भारतीय लाँचची माहिती मात्र कंपनीनं दिली नाही. परंतु लवकरच लो बजेटमध्ये शाओमी-रियलमीला धक्का देण्याचा प्रयत्न कंपनी करू शकते.  

Motorola Moto G22 चे स्पेसिफिकेशन्स 

Motorola Moto G22 मध्ये फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि दोन 2 मेगापिक्सलचे सेन्सर देण्यात आले आहेत. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह रियर फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते. यातील 5,000एमएएच बॅटरी 15वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्टसह पावर बॅकअप देते. 

मोटो जी22 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. जो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टम कंपनीनं दिली आहे. प्रोसेसिंगसाठी ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकच्या हीलियो जी37 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. यात 4 जीबी रॅमव आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.  

हे देखील वाचा:

Web Title: Motorola Moto G22 Launched With 50mp Camera 5000mAh Battery In Low Budget Know Price Specifications 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.