रेडमी-रियलमीच्या चिंतेत वाढ; Motorola चा स्वस्त आणि दमदार स्मार्टफोन येतोय भारतात
By सिद्धेश जाधव | Published: April 5, 2022 02:39 PM2022-04-05T14:39:58+5:302022-04-05T14:40:10+5:30
जागतिक बाजारात Moto G22 या डिवाइसनं 4GB RAM, MediaTek Helio G37, 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह पदार्पण केलं आहे.
Motorola चा स्वस्त स्मार्टफोन भारतात येणार असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. आता कंपनीनं स्वतःहून Moto G22 च्या भारतीय लाँचची माहिती दिली आहे. याआधी हा फोन जागतिक बाजारात 4GB RAM, MediaTek Helio G37 चिपसेट, 50MP Camera आणि 5,000mAh Battery सह सादर झाला आहे.
मोटोरोला इंडियानं आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलच्या माध्यमातून Moto G22 चा लाँच टीज केला आहे. तसेच फ्लिपकार्टवर देखील या स्मार्टफोनचं लिस्टिंग करण्यात आलं आहे. फ्लिपकार्टवरील प्रोडक्ट पेजनुसार मोटो जी22 स्मार्टफोन येत्या 8 एप्रिलला भारतीय बाजारात सादर केला जाईल. इथे सर्व स्पेक्सची माहिती देण्यात आली आहे, परंतु किंमत मात्र कंपनीनं सांगितली नाही.
Motorola Moto G22 चे स्पेसिफिकेशन्स
मोटो जी22 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. जो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टम कंपनीनं दिली आहे. प्रोसेसिंगसाठी ऑक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकच्या हीलियो जी37 चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. यात 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज मिळते. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.
Motorola Moto G22 मध्ये फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि दोन 2 मेगापिक्सलचे सेन्सर देण्यात आले आहेत. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटीसह रियर फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते. यातील 5,000एमएएच बॅटरी 20वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्टसह पावर बॅकअप देते.