12,999 रुपयांमध्ये लाँच झाला MOTO G31; फोनमध्ये 50MP Camera आणि 5000mAh ची बॅटरी
By सिद्धेश जाधव | Published: November 29, 2021 03:17 PM2021-11-29T15:17:32+5:302021-11-29T15:18:00+5:30
Motorola Moto G31 Price In India: Motorola Moto G31 स्मार्टफोन भारतात 50MP Camera, 5000mAh Battery आणि 6GB RAM सह सादर करण्यात आला आहे.
Motorola Moto G31 Price In India: Motorola नं भारतात बजेट सेगमेंटमध्ये Moto G31 स्मार्टफोन लाँच केला आहे. काही दिवसांपूर्वी हा फोन युरोपियन बाजारात उतरवण्यात आला होता. हा स्मार्टफोन 50MP Camera, 5000mAh Battery आणि 6GB RAM सह सादर करण्यात आला आहे. कंपनीनं या फोनची किंमत 12,999 रुपये ठेऊन भारतीय बाजारातील Xiaomi आणि Realme सारख्या ब्रँड्सना आव्हान दिलं आहे.
Moto G31 Price in India
मोटोरोलानं मोटो जी31 स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट्स सादर केले आहेत. यातील 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला मॉडेल 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटसाठी 14,999 रुपये मोजावे लागतील. हा फोन 6 डिसेंबरपासून फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल.
Moto G31 चे स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये 6.4-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले मिळतो. Moto G31 4GB रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट कंपनीने दिला आहे. तसेच डिवाइस मीडियाटेकच्या ऑक्टा कोर Helio G85 चिपसेट आणि Mali G52 GPU सह सादर करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 11 आधारित माययुएक्सवर चालतो.
Motorola Moto G31 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50MP चा मुख्य कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर फोनमध्ये 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. हा मोटोरोला फोन 13MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
या स्मार्टफोनमध्ये 3.5mm ऑडियो पोर्ट, USB Type-C पोर्ट असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन मिळतात. त्याचबरोबर IP52 रेटिंग आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. Moto G31 स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहेत, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.