15,000 रुपयांच्या आत येऊ शकतो दमदार Motorola Moto G31; भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस 

By सिद्धेश जाधव | Published: November 23, 2021 02:13 PM2021-11-23T14:13:53+5:302021-11-23T14:15:58+5:30

Motorola Moto G31 Price In India: Moto G31 च्या भारतीय किंमतीची माहिती देखील 91mobiles ने दिली आहे. हा फोन 29 नोव्हेंबरला भारतात सादर केला जाऊ शकतो.

Motorola moto g31 price in india leaked ahead of launch   | 15,000 रुपयांच्या आत येऊ शकतो दमदार Motorola Moto G31; भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस 

15,000 रुपयांच्या आत येऊ शकतो दमदार Motorola Moto G31; भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस 

googlenewsNext

Motorola Moto G31 Price In India:  गेल्या आठवड्यात मोटोरोलाने युरोपियन बाजारात धमाका केला होता. कंपनीने एकाच दिवशी एक-दोन नव्हे तर 6 फोन्स सादर केले होते. हे सर्व स्मार्टफोन्स युरोपियन बाजारात आले होते. आता हे फोन्स भारतीय बाजारात पदार्पण करणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच यातील मिड-रेंज Moto G31 च्या भारतीय किंमतीची माहिती देखील 91mobiles ने दिली आहे.  

Motorola Moto G31 Price In India 

91मोबाईल्सने टिपस्टर योगेशच्या हवाल्याने Motorola Moto G31 च्या च्या किंमतीची माहिती दिली आहे. त्यानुसार Moto G31 चा 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 14,999 रुपये (MOP) असेल. या किंमतीत हा फोन रिटेल सेलर्सना देण्यात येईल, ग्राहकांना यापेक्षा जास्त रक्कम मोजावी लागू शकते. तसेच याआधी आलेल्या लीकनुसार मोटोरोला 29 नोव्हेंबरला भारतात Moto G31 सादर करेल. याची माहिती टिपस्टर मुकुल शर्माने दिली आहे.  

Moto G31 चे स्पेसिफिकेशन्स  

Motorola Moto G31 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 50MP चा मुख्य कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर फोनमध्ये 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. हा मोटोरोला फोन 13MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.  

Moto G31 4GB रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट कंपनीने दिला आहे. फोनमध्ये 6.4-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले मिळतो. तसेच डिवाइस मीडियाटेकच्या ऑक्टा कोर Helio G85 चिपसेट आणि Mali G52 GPU सह सादर करण्यात आला आहे.  

Moto G31 स्मार्टफोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहेत, जी 10W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोनमध्ये 3.5mm ऑडियो पोर्ट, USB Type-C पोर्ट असे कनेक्टिव्हिटी ऑप्शन मिळतात. त्याचबरोबर IP52 रेटिंग आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. 

Web Title: Motorola moto g31 price in india leaked ahead of launch  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.