5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह Motorola Moto G51 5G देणार का शाओमी-रियलमीला टक्कर?
By सिद्धेश जाधव | Published: November 19, 2021 01:00 PM2021-11-19T13:00:50+5:302021-11-19T13:01:08+5:30
Motorola Moto G51 5G Phone Price Launch: Moto G51 5G Phone युरोपियन बाजारात स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि 120Hz रिफ्रेश रेटसह मोटोरोलाने सादर केला आहे.
Motorola Moto G51 5G Phone Price : Motorola ने फ्लॅगशिपपासून बजेट सेगमेंट पर्यंत स्मार्टफोन आपल्या कालच्या लाँच इव्हेंटमधून सादर केले आहेत. हे स्मार्टफोन कंपनीच्या G Series अंतर्गत युरोपियन बाजारात आणले आहेत. हे फोन्स लवकरच भारतासह जगभरात उपलब्ध होतील, असे सांगण्यात आले आहे. कंपनीच्या नवीन 6 स्मार्टफोन्सपैकी Moto G51 5G Phone ची माहिती आपण या लेखात जाणून घेऊया.
Moto G51 5G चे स्पेसिफिकेशन्स
Moto G51 चा कॅमेरा सेगमेंट पाहता, यात LED फ्लॅश असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअपमधील कॅमेऱ्याचे रिजोल्यूशन 50MP आहे. ज्याला 2MP च्या मॅक्रो कॅमेरा आणि 8MP च्या अल्ट्रा वाईड अँगल सेन्सरची जोड देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 13MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.
Moto G51 5G स्मार्टफोनमध्ये 6.8 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी Moto G51 5G मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोनमध्ये 3.5mm ऑडियो पोर्ट, USB Type-C पोर्ट, गुगल असिस्टंट बटन, IP52 रेटिंग, डॉल्बी अॅटमॉस आणि साइड माउंटेड फिगर प्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
Moto G51 स्मार्टफोनमध्ये Qualcomm च्या Snapdragon 480+ SoC ची प्रोसेसिंग पॉवर देण्यात आली आहे. तसेच हा फोन ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU ला सपोर्ट करतो. कंपनीने हा 4GB रॅम आणि 64GB स्टोरेजसह सादर केला आहे. या मोटोरोलाच्या 5G Phone मधील स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो-एसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.
Moto G51 5G ची किंमत
Moto G51 स्मार्टफोन 229.99 यूरो मध्ये सादर करण्यात आला आहे. ही किंमत सुमारे 19,349 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा स्मार्टफोन ब्राईट सिल्वर, इंडिगो ब्लू आणि अॅक्वा ब्लू कलर व्हेरिएंटमध्ये विकत घेता येईल.