Motorola चा अजून एक फाडू स्मार्टफोन Moto G52, किंमत आहे परवडणारी 

By सिद्धेश जाधव | Published: April 13, 2022 12:38 PM2022-04-13T12:38:44+5:302022-04-13T12:39:20+5:30

Moto G52 स्मार्टफोनमध्ये 6GB RAM, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे.

Motorola Moto G52 Launched With 50MP Camera Know Price Specs Sale Offer | Motorola चा अजून एक फाडू स्मार्टफोन Moto G52, किंमत आहे परवडणारी 

Motorola चा अजून एक फाडू स्मार्टफोन Moto G52, किंमत आहे परवडणारी 

googlenewsNext

Motorola नं आपल्या बजेट फ्रेंडली ‘जी’ सीरिजचा विस्तार केला आहे. कंपनीनं Moto G22 स्मार्टफोननंतर आता Moto G52 लाँच केला आहे. सध्या हा डिवाइस युरोपियन बाजारात लाँच झाला आहे. यात 6GB RAM, 50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे. कंपनी सध्या भारतीय बाजारात जास्त सक्रिय झाल्यामुळे मोटोरोला मोटो जी52 देखील लवकरच भारतीयांच्या सेवेत दाखल होऊ शकतो.  

Moto G52 चे स्पेसिफिकेशन्स 

मोटोरोला मोटो जी52 स्मार्टफोन 6.6 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह बाजारात आला आहे. ही पंच-होल ओएलईडी स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. हा डिवाइस अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित माययूएक्सवर चालतो. प्रोसेसिंगसाठी यात क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 6 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते. जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.  

मोटोरोला मोटो जी52 स्मार्टफोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. सोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे. फ्रंटला 16 मेगापिक्सलच्या सेल्फी शुटर आहे. बेसिक कनेक्टिव्हिटीसह यात आयपी52 रेटिंग मिळते. यातील 5,000एमएएच बॅटरी 30वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.  

Motorola Moto G52 ची किंमत 

मोटो जी52 च्या 4 जीबी रॅम आणि 128 जीबी मॉडेलची किंमत 249 यूरो (सुमारे 20,500 रुपये) ठेवण्यात आली आहे. परंतु इतर व्हेरिएंट्सची किंमत मात्र कंपनीनं सांगितली नाही.  

 

Web Title: Motorola Moto G52 Launched With 50MP Camera Know Price Specs Sale Offer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.