108MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी इतक्या स्वस्तात पुन्हा मिळणार नाही; एकदा बघाच Moto G60 वरील ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 12:47 PM2022-01-12T12:47:55+5:302022-01-12T12:55:18+5:30
Moto G60 स्मार्टफोन 108MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी आणि 120Hz रिफ्रेश रेटसह सादर करण्यात आला आहे. यावर फ्लिपकार्टनं काही ऑफर्सची घोषणा केली आहे.
Motorola नं काही दिवसांपूर्वी आपला 108 मेगापिक्सल कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन Moto G60 सादर केला होता. आता हा स्मार्टफोन Flipkart वर जबरदस्त डिस्काउंटसह उपलब्ध आहे. जर तुम्ही एक कमी बजेटमध्ये एक चांगला कॅमेरा असलेला फोन शोधत असाल तर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. चला जाणून घेऊया Moto G60 वरील ऑफर्स.
Motorola G60 स्मार्टफोनवर फ्लिपकार्टकडून 4000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्यामुळे या फोनची किंमत 17,999 रुपये झाली आहे. तसेच Flipkart Axis क्रेडिट कार्ड धारकांना यावर 5 टक्के कॅशबॅक मिळेल. सूट वर स्मार्टफोन को खरीद पाएंगे. हा फोन फक्त 624 रुपयांच्या ईएमआयवर देखील विकत घेता येईल. तुमचा जुना फोन एक्सचेंज करून अजून 15,450 रुपयांची बचत करता येईल.
Moto G60 चे स्पेसिफिकेशन्स
Moto G60 मध्ये 6.82 इंचाचा मोठा Max Vision FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. यात क्वालकॉमचा Snapdragon 732G चिपसेट देण्यात मिळतो. सोबत 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते. हा स्मार्टफोन Android 11 वर चालतो.
Moto G60 स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 108 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे, सोबत 8 मेगापिक्सलचा वाईड अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह या स्मार्टफोनमध्ये 6000mAh बॅटरीसह Quick Charge 4.0 सपोर्ट देण्यात आला आहे.
हे देखील वाचा:
15 मिनिटांत फुलचार्ज होणाऱ्या Xiaomi च्या 5G Phone वर 9,500 रुपयांची सूट; आत्ताच जाणून घ्या ऑफर