Moto G71 5G: भारतातील सर्वात स्वस्त 5G Phone; 5000mAh ची बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग आणि 8GB RAM
By सिद्धेश जाधव | Published: January 10, 2022 03:01 PM2022-01-10T15:01:20+5:302022-01-10T15:01:34+5:30
Moto G71 5G Price In India: Moto G71 5G मध्ये 6GB RAM, Snapdragon 695 चिपसेट, 50MP Camera, 33W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh Battery आहे.
Motorola नं भारतातील आपला स्मार्टफोन पोर्टफोलियो वाढवला आहे. कंपनीनं देशात आपला सर्वात स्वस्त 5G Phone सादर केला आहे. ‘जी’ सीरीजमध्ये आलेला Moto G71 5G मध्ये 6GB RAM, Snapdragon 695 चिपसेट, 50MP Camera, 33W फास्ट चार्जिंग आणि 5,000mAh Battery आहे. हा फोन रेडमी आणि रियलमीला चांगली टक्कर देऊ शकतो.
Moto G71 5G Price In India
Moto G71 5G चा एकच व्हेरिएंट भारतात उपलब्ध झाला आहे, ज्यात 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या स्मार्टफोनची किंमत 18,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन 19 जानेवारीपासून फ्लिपकार्टवरून Neptune Green आणि Arctic Blue कलरमध्ये विकत घेता येईल.
Motorola Moto G71 5G चे स्पेसिफिकेशन्स
Moto G71 5G स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा FHD+ OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. प्रोसेसिंसाठी यात Qualcomm Snapdragon 695 चिपसेट मिळतो. त्याचबरोबर ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU देण्यात आला आहे. हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह सादर झाला आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डने वाढवता येते. तसेच रॅम देखील 8GB करता येईल.
Moto G71 स्मार्टफोनमध्ये LED फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. या कॅमेऱ्याला 8MP च्या अल्ट्रा वाईड लेन्स आणि 2MP च्या मॅक्रो कॅमेरा लेन्सची जोड देण्यात आली आहे. या डिवाइसमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.
Moto G71 5G अँड्रॉइड 11 वर लाँच केला गेला आहे जो माययुआयसह मिळून चालतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह यात फेस अनलॉक आणि रियर फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा देण्यात आली आहे. या फोनला आयपी52 ची रेटिंग देण्यात आली आहे, म्हणजे हा डिवाइस धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो. या मोबाईलमध्ये 5000mAh ची बॅटरी 30W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.
हे देखील वाचा:
हॅकर्सच्या हातात आयतं कोलीत देऊ नका; UPI पेमेंट करताना या 5 चुका टाळा, नाही तर...