टॅबलेट सेगमेंटमधील वातावरण तापणार; रियलमी- नोकिया नंतर Motorola चा टॅबलेट होणार भारतात लाँच  

By सिद्धेश जाधव | Published: September 22, 2021 04:49 PM2021-09-22T16:49:41+5:302021-09-22T16:50:43+5:30

Moto Tab G20 Price In India: रियलमीने आपला टॅब रियलमी पॅड सादर केला आहे. नोकियाने देखील आपला टॅबलेट टीज केला आहे आणि आता मोटोरोलाच्या टॅबलेटची बातमी समोर आली आहे.  

Motorola moto tab g20 tablet may launch in india on september 30 check price and features  | टॅबलेट सेगमेंटमधील वातावरण तापणार; रियलमी- नोकिया नंतर Motorola चा टॅबलेट होणार भारतात लाँच  

टॅबलेट सेगमेंटमधील वातावरण तापणार; रियलमी- नोकिया नंतर Motorola चा टॅबलेट होणार भारतात लाँच  

Next

Motorola इंडियाने कालच आपला नवीन स्मार्टफोन भारतात सादर करण्याची घोषणा केली आहे. कंपनी आपला ‘प्रो’ स्मार्टफोन देशात लाँच करणार असल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे. हा फोन Motorola Edge 20 Pro असू शकतो. जो याआधी जागतिक बाजारात सादर करण्यात आला आहे. आता टिपस्टर मुकुल शर्माने मोटोरोला भारतात नवीन टॅबलेट देखील लाँच करणार आहे, असा दावा केला आहे.  

टिप्सटरने दिलेल्या माहितीनुसार कंपनी Moto Tab G20 नावाचा टॅबलेट देशात 30 सप्टेंबरला लाँच करू शकते. या ट्विट सोबत मोटोरोला टॅबलेटचा एक फोटो देखील शेयर करण्यात आला आहे. या इमेजमधून टॅबलेटच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे. परंतु हा टॅब कधी आणि कोणत्या स्पेसिफिकेशन्ससह सादर केला जाईल हे मात्र समजले नाही. काही दिवसांपूर्वी रियलमीने आपला टॅब रियलमी पॅड सादर केला आहे. नोकियाने देखील आपला टॅबलेट टीज केला आहे आणि आता मोटोरोलाच्या टॅबलेटची बातमी समोर आली आहे.  

Moto Tab G20 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स 

Motorola ने या टॅबलेटची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु लिक्स आणि रिपोर्ट्सनुसार, हा मोटोरोला टॅबलेट 8-इंचाचा फुल एचडी डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो. यात MediaTek Helio P22T SoC मिळू शकते. त्याचबरोबर या टॅबलेटमध्ये 4GB RAM सह 32GB आणि 64GB स्टोरेज ऑप्शन मिळू शकतात. या मोटोरोला टॅबलेटमध्ये 13MP चा सिंगल रियर कॅमेरा आणि 8MP चा फ्रंट कॅमेरा असेल. 5000mAh च्या बॅटरीसह येणाऱ्या या टॅबलेटची किंमत 20,000 रुपयांच्या आसपास ठेवली जाऊ शकते.  

Web Title: Motorola moto tab g20 tablet may launch in india on september 30 check price and features 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.