7700mAh च्या राक्षसी बॅटरीसह Motorola नं लाँच केला टॅबलेट; जाणून घ्या Moto Tab G70 ची किंमत   

By सिद्धेश जाधव | Published: January 14, 2022 11:39 AM2022-01-14T11:39:11+5:302022-01-14T11:39:25+5:30

Motorola Moto Tab G70: Motorola Moto Tab G70 जागतिक बाजारात 7700mAh बॅटरी, 4GB RAM, 2K Display आणि 18W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे. या टॅबची भारतातील किंमतीचा अंदाज या लाँचवरून मिळाला आहे.

Motorola Moto Tab G70 Launched know Price Specs sale  | 7700mAh च्या राक्षसी बॅटरीसह Motorola नं लाँच केला टॅबलेट; जाणून घ्या Moto Tab G70 ची किंमत   

7700mAh च्या राक्षसी बॅटरीसह Motorola नं लाँच केला टॅबलेट; जाणून घ्या Moto Tab G70 ची किंमत   

Next

Motorola येत्या 18 जानेवारीला भारतात Moto Tab G70 लाँच करणार आहे, याची माहिती कंपनीनं स्वतःहून दिली आहे. हा टॅब फ्लिपकार्टवर लिस्ट देखील करण्यात आला आहे, परंतु या डिवाइसची किंमत अजून समजली नाही. आता हा टॅबलेट जागतिक बाजारात आला आहे त्यामुळे Motorola Tab G70 च्या किंमतीचा अंदाज मिळाला आहे.  

Moto Tab G70 ची किंमत  

Motorola Tab G70 सध्या ब्राजीलमध्ये लाँच केला गेला आहे, तिथे या टॅबलेटची किंमत 2,159 BRL अर्थात सुमारे 29,000 रुपये ठेवण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा डिवाइस भारतात आल्यावर याची किंमत कमी होऊ शकते. याची भारतीय किंमत मात्र पुढील आठवड्यातच समोर येईल.  

Moto Tab G70 चे स्पेसिफिकेशन्स  

फ्लिपकार्ट लिस्टिंग नुसार, Moto Tab G70 मध्ये 11 इंचाचा डिस्प्ले आहे. हा एक 2K रिजोल्यूशन असलेला आयपीएस एलसीडी डिस्प्ले. जो 400निट्स ब्राईटनेस आणि आय कंफर्ट फीचरसह सादर केला जाईल. हा टॅब अ‍ॅल्युमिनियम एलॉय बॉडी आणि आयपी52 रेटेड वॉटरप्रूफ रेटिंगसह विकत घेता येईल. Moto Tab G70 अँड्रॉइड 11 ओएसवर सादर केला जाईल   

प्रोसेसिंगसाठी यात 2.05गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेक हीलियो जी90टी चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्स साठी माली जी76 जीपीयू देण्यात आला आहे. कंपनीनं यात 4 GB RAM आणि 64 GB इंटरनल स्टोरेज दिली आहे. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 1टीबी पर्यंत वाढवता येते.   

फोटोग्राफीसाठी यात 13 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच हा मोटो टॅब 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह येणारा हा डिवाइस ड्युअल माइक आणि क्वॉड स्पिकरला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी मोटो टॅब जी70 मध्ये 7,770एमएएचची बॅटरी मिळणार आहे.   

हे देखील वाचा:

हे काम करा म्हणजे IRCTC वरून मिळेल कन्फर्म Tatkal Ticket

तुम्हाला ताप आहे कि नाही सांगणार स्मार्टवॉच; ब्लड प्रेशरची देखील घेणार काळजी, 8 दिवसांचा बॅटरी बॅकअप

Web Title: Motorola Moto Tab G70 Launched know Price Specs sale 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.