सहा कॅमेरे, पॉवरफुल बॅटरीसह येतोय धमाकेदार फोन Motorola Nio

By जयदीप दाभोळकर | Published: January 18, 2021 03:35 PM2021-01-18T15:35:35+5:302021-01-18T15:49:28+5:30

पाहा काय असतील स्पेसिफिकेशन्स

Motorola Nio Appears in Sky Colour With a Quad Rear Camera Setup in Leaked Pictures social media | सहा कॅमेरे, पॉवरफुल बॅटरीसह येतोय धमाकेदार फोन Motorola Nio

सहा कॅमेरे, पॉवरफुल बॅटरीसह येतोय धमाकेदार फोन Motorola Nio

Next
ठळक मुद्देयापूर्वी मोटोरोलानं लाँच केला होता सर्वात स्वस्त 5G फोनMotorola Nio हा फोन स्काय कलर ऑप्शनसह येण्याची शक्यता

भारतात सध्या कोणतीही मोबाईल कंपनी 5G सुविधा देत नसली तरी येत्या काळात देशात 5G सुविधा सुरू होण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे भविष्याकडे पाहून अनेक ग्राहकांचा कलही 5G मोबाईल्सकडेच वळत असल्याचं दिसून येत आहे. Motorola Moto G 5G हा सर्वात स्वस्त मोबाईल लाँच करून धुमाकुळ घातलेल्या स्मार्टफोन कंपनी Motorola आता भारतात आपला आणखी एक फोन Motorola Nio लाँच करण्याच्या तयारीत आहे. या मोबाईलमध्ये तब्बल ६ कॅमेरे, मोठी बॅटरी, हार्ड डिस्प्ले रिफ्रेशरेटसह पॉवरफुल प्रोसेसरही असणार आहे. 

Motorola Nio (कोडनेम) मध्ये ६४ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा असणार आहे. याव्यतिरिक्त यामध्ये अनेक भन्नाट फिचर्स असणार आहेत. युझर्समध्येही आतापासूनच या मोबाईलची क्रेझ पाहायला मिळत आहे. नुकतंच व्हॉईसवर Nils Ahrensmeier (@NilsAhrDE) ने जारी केलेल्या फोटोनुसार Motorola Nio हा फोन स्काय कलर ऑप्शनसह Beryl व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाणार आहे. 

Motorola Nio च्या उजवीकडील बाजूला वॉल्युम बटन आणि पॉवर बटनसह फिंगरप्रिन्ट सेन्सरही असणार आहे. याव्यतिरिक्त Audio Zoom हे फीचरही दिलं जाण्याची शक्यता आहे. हे फिचर सध्या अन्य मोबाईल कंपन्यांच्या फ्लॅगशिप फीचरसह मिळतं. येत्या काळा मोटोरोला हा फोन Motorola Edge S या नावानंदेखील लाँच करू शकतो.

काय असू शकतात स्पेसिफिकेशन्स

Motorola Nio च्या लिक स्पेसिफिकेशन्सनुसार यात ६.७ इंचाचा Full HD+ डिस्प्ले देण्यात ला आहे. याचं रिझॉल्युशन 1080*2520 पिक्सेल असेल. Motorola Nio हा स्मार्टफोन Android 11 वर चालणार आहे आणि यात Qualcomm Snapdragon 865 SoC हा प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनी हा फोन 105Hz डिस्प्ले रिफ्रेश रेटनं लाँच करू शकते. तसंच या मोबाईल ८ जीबी आणि १२ जीबी रॅम व्हेरिअंटसह येण्याची शक्यता आहे. तसंच सेल्फीच्या चाहत्यांसाठी हा फोन पर्वणीच ठरणार आहे. य़ा फोनमध्ये दोन फ्रन्ट कॅमेरे देण्यात आले आहे. तसंच मागील बाजूला ४ कॅमेरे असणार असून यातील मुख्य कॅमेरा ६४ मेगापिक्सेलचा असेल.

Web Title: Motorola Nio Appears in Sky Colour With a Quad Rear Camera Setup in Leaked Pictures social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.