अरे वाह! 512GB मेमरीसह येऊ शकतो Motorola Razr 3; प्रोसेसरची ताकद देखील वाढणार
By सिद्धेश जाधव | Published: March 28, 2022 05:37 PM2022-03-28T17:37:59+5:302022-03-28T17:38:14+5:30
Motorola Razr 3 वर कंपनी काम करत आहे. हा आतापर्यंतचा कंपनीचा सर्वात शक्तिशाली फोल्डेबल स्मार्टफोन असेल.
Motorola Razr 3 कंपनीचा आगामी फोल्डेबल फोन असेल. मोटोरोलानं या सीरिजची सुरुवात 2019 मध्ये केली होती. आता या लाईनअपमध्ये पुढील मॉडेलचा समावेश केला जाईल. एका ताज्या लीकमधून या आगामी स्मार्टफोनच्या स्टोरेजची माहिती मिळाली आहे. त्यानुसार, मोटोरोला रेजर 3 मध्ये 512GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते.
ही माहिती स्वतः कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मायक्रो ब्लॉगिंग साईट विबोवर टीज केली आहे. Lenovo चे एग्जिक्यूटिव Chen Jin यांनी Moto Edge S30 च्या 512GB व्हेरिएंटच्या लोकप्रियतेची माहिती दिली आहे. तसेच आगामी Motorola स्मार्टफोनमध्ये देखल जास्त स्टोरेज देण्याचा विचार कंपनी करता असल्याचं सांगतील आहे. यात कंपनीच्या फोल्डेबल स्मार्टफोन्सचा देखील समावेश असेल.
Motorola Razr 3
चेन जीन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी Motorola Razr 3 मध्ये 512GB ची स्टोरेज असेल, असा अंदाज बांधला जात आहे. आतापर्यंत या लाईनअपमध्ये 256GB स्टोरेज असलेला मॉडेल देण्यात आला आहे. त्यामुळे 2022 मध्ये येणारा फोल्डेबल मोटोरोला मोठ्या अपग्रेडसह येऊ शकतो. लिक्सनुसार, Motorola Razr 3 च्या प्रोसेसरमध्ये देखील अपग्रेड दिसू शकतो. हा फोन Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसर आणि 6GB, 8GB किंवा 12GB RAM सह बाजारात येईल. कंपनी Motorola Razr 3 फोन 2022 च्या उत्तराधार्त सादर करू शकते.