सॅमसंगची झोप उडवण्याची पुरेपूर तयारी; फोल्डिंग Motorola Razr 3 मध्ये मोठा कॅमेरा अपग्रेड 

By सिद्धेश जाधव | Published: May 9, 2022 12:04 PM2022-05-09T12:04:29+5:302022-05-09T12:04:40+5:30

मोटोरोलाच्या आगामी फोल्डिंग फोन Motorola Razr 3 चे फोटोज ऑनलाईन लीक झाले आहेत. या फोनच्या कॅमेरा सेटअपमध्ये मोठा अपग्रेड बघायला मिळेल.  

Motorola Razr 3 Images Leaked Online May Come With Dual Camera Setup   | सॅमसंगची झोप उडवण्याची पुरेपूर तयारी; फोल्डिंग Motorola Razr 3 मध्ये मोठा कॅमेरा अपग्रेड 

सॅमसंगची झोप उडवण्याची पुरेपूर तयारी; फोल्डिंग Motorola Razr 3 मध्ये मोठा कॅमेरा अपग्रेड 

Next

फोल्डिंग फोन्स सेगमेंटमध्ये सॅमसंगनं आपलं स्थान मजबूत केलं आहे. अन्य स्मार्टफोन कंपन्या ही मक्तेदारी मोडीत काढण्याचे प्रयत्न करत आहेत. आता Motorola Razr 3 स्मार्टफोन देखील सॅमसंगच्या गॅलेक्सी फ्लिप सीरिजला टक्कर देण्यासाठी येत आहे. आगामी Razr 3 चे काही फोटोज ऑनलाइन लीक झाले आहेत. यातून फोनची Clamshell फोल्डिंग डिजाइन निश्चित झाली आहे.  

Motorola Razr 3 ची डिजाईन 

91mobiles नं प्रसिद्ध टिप्सटर Evan Blass च्या हवाल्याने Motorola च्या आगामी फोल्डेबल फोनचे फोटोज लीक केले आहेत. याची क्लॅमशेल डिजाईनपाहून हा Motorola Razr 3 असेल असं वाटत आहे. लिस्टिंगमध्ये मात्र हा डिवाइस Maven कोडनेमसह लिस्ट करण्यात आला आहे. या फोनची डिजाईन पाहून मोटोरोलाचा आगामी फोल्डेबल कॅमेरा अपग्रेडसह लाँच होईल हे स्पष्ट झालं आहे.  

रिपोर्टनुसार, आगामी मोटोरोला फोल्डेबल फोन डु्अल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात येईल, ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 8MP चा सेकंडरी सेन्सर मिळेल. सेल्फीसाठी फोनमध्ये फ्रंटला 32MP चा कॅमेरा मिळेल. जुन्या Motorola Razr 2020 मध्ये मात्र कंपनीनं एकच रियर कॅमेरा सेन्सर दिला होता. नव्या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर पावर बटन एम्बेड करण्यात येईल.  

Motorola Razr 3 चे लीक स्पेसिफिकेशन्स  

यावेळी कंपनी पंच होल कटआउटमध्ये सेल्फी कॅमेरा देऊ शकते. तसेच Razr 3 फोल्डेबल फोनमध्ये AMOLED पॅनल 120Hz रिफ्रेश रेटसह मिळू शकतो. यातील मुख्य डिस्प्ले फुल एचडी+ रिजोल्यूशनला सपोर्ट करेल. जुन्या डिजाईनप्रमाणे सेकंडरी डिस्प्ले देखील देण्यात येईल. 

Motorola Razr 3 स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. सोबत 12GB पर्यंतचा रॅम आणि 512GB पर्यंतची स्टोरेज देखील दिली जाऊ शकते. मोटोरोलाचा हा फोन Android 12 OS वर चालेल. Razr 3 फोनमध्ये 2,800mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.  

फोटोग्राफीसाठी स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सल OV50A OmniVision प्रायमरी कॅमेरा दिला जाईल, सोबत 8-मेगापिक्सलचा अल्ट्रावाईड आणि मॅक्रो कॅमेरा मिळेल. पंच होलमधील सेल्फी कॅमेरा 32-मेगापिक्सलचा OmniVision सेन्सर असेल. मीडिया रिपोर्टनुसार Motorola Razr 3 स्मार्टफोन जून 2022 मध्ये लाँच केला जाऊ शकतो. 

Web Title: Motorola Razr 3 Images Leaked Online May Come With Dual Camera Setup  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.