Motorola Edge S चा जलवा; दोन मिनिटांत १० हजार युनिट्स 'SOLD OUT'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 06:37 PM2021-02-03T18:37:29+5:302021-02-03T18:40:30+5:30
पाहा काय आहेत याचे जबरदस्त स्पेसिफिकेशन्स
मोटोरोलाचा फ्लॅगशिप स्मार्टफोन Motorola Edge S ला युझर्सकडून जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. चीनमध्ये सर्वप्रथम लाँच करण्यात आलेल्या या फोनचा आज पहिला सेल होता. या सेलदरम्यान केवळ दोनच मिनिटांमध्ये या स्मार्टफोनच्या 10 हजार युनिट्सची विक्री झाली. या फोनची चीनमधील किंमत 1999 युआन म्हणजेच भारतीय रूपयांमध्ये जवळपास 22,500 रूपये इतकी आहे. हा फोन एमरेल्ड ग्लेज आणि एमरेल्ड लाईट या दोन कलर ऑप्शनमध्ये हा फोन येतो.
या फोनमध्ये 2520*1080 पिक्लेल रिझॉल्युशनसह 6.7 इंचाचा एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच डिस्प्लेचा आस्पेक्ट रेशो 21.9 असून आणि तो 90Hz रिफ्रेश रेटसह येतो. याशिवाय चांगल्या व्ह्यूविंग अँगलसाठी यात HDR 10 चा सपोर्टही देण्यात आला आहे. 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये Snapdragon 870 SoC Processor देण्यात आला आहे. या प्रोसेसरसह लाँच करण्यात आलेला हा पहिला फोन आहे. या स्मार्टफोनमध्ये LPDDR5 रॅम देण्यात आली असून ती LPDDR4 रॅमपेक्षा 72 टक्के अधिक वेगवान आहे. याव्यतिरिक्त फोनमध्ये UFS 3.1 स्टोरेजही मिळतं.
या स्मार्टफोनमध्ये एकूण सहा कॅमेरे देण्यात आले असून पुढील बाजूला दोन आणि मागील बाजूला चार कॅमेरे आहेत. यात 64 मेगापिक्सेलच्या प्रायमरी सेन्सरसह एक 16 मेगापिक्सेलची अल्टा वाईड लेन्स, २ मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सिंग कॅमेरा आणि ToF कॅमेरा लेन्सही देण्यात आली आहे. सेल्फीसाठी यात 16 आणि 8 मेगापिक्सेलचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. Motorola Edge S मध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली असून ती 20 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. तसंच हा स्मार्टफोन अँड्रॉईड ओएस 11 वर चालतो.