Motorola लाँच करणार Edge 30 Ultra चा 200MP कॅमेरा असलेला नवा लूक; जाणून घ्या फिचर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 06:15 PM2022-10-18T18:15:23+5:302022-10-18T18:17:33+5:30

मोटोरोला आता मोबाईलमध्ये नवे मॉडेल लाँच करत आहे. मोटोरोलाने Edge 30 Ultra डिव्हाइस गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्येच बाजारात आणला होता.

Motorola to Bring Edge 30 Ultra New Look with 200MP Camera Learn Features | Motorola लाँच करणार Edge 30 Ultra चा 200MP कॅमेरा असलेला नवा लूक; जाणून घ्या फिचर

Motorola लाँच करणार Edge 30 Ultra चा 200MP कॅमेरा असलेला नवा लूक; जाणून घ्या फिचर

Next

मोटोरोला आता मोबाईलमध्ये नवे मॉडेल बाजारात लाँच करत आहे. मोटोरोलाने Edge 30 Ultra डिव्हाइस गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्येच बाजारात आणला होता. लाँचवेळी, कंपनीने Motorola Edge 30 Ultra 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज वेरिएंटमध्ये आणला.यावेळी कंपनीने यातच नवे मॉडेल लगेच बाजारात आणणार असल्याची घोषणा केली होती.

मोटोरालाने 12 GB RAM आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंट उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. आता मोटोरोलाने Flipkart वर Edge 30 Ultra चा टॉप-एंडचे फिचर आणले आहे.

5G नंतरही जिओचे 'हे' 4G प्लॅन हिट, अनलिमिटेड कॉल्स-डेटासह Netflix, Amazon Prime व Hotstar मोफत

Edge 30 अल्ट्रा हा भारतातील पहिला फोन आहे जो 200 मेगापिक्सेलच्या कॅमेरासह लाँच झाला आहे. याशिवाय 125W फास्ट चार्जिंग, 144 हर्ट्ज पोलइडी स्क्रीन, 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 60 मेगापिक्सेल सेल्फी सेन्सर यासारखे फिचर्स यामध्ये देण्यात आले आहेत. 

Motorola Edge 30 Ultra स्मार्टफोन 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा फोन फ्लिपकार्टवर 64,999 रुपयांना दाखवण्यात आला आहे. कंपनीने 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 54,999 रुपयांमध्ये लाँच केले आहे. हा मोबाईल इंटरस्टेलर ब्लॅक आणि स्टारलाईट व्हाईट कलरमध्ये उपलब्ध आहे. हा मोबाईल खरेदी करणाऱ्यांसाठी SBI क्रेडिट कार्डचा वापर केला तर तुम्हाला  10 टक्के पर्यंत सूट मिळू शकते.

Motorola Edge 30 Ultra मध्ये 6.67 इंच फुलएचडी तसेच पोलेड डिस्प्ले आहे. हा डिव्हाइस Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरद्वारे आहे. फोनमध्ये 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे.

यात ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तर 200 मेगापिक्सलचा सॅमसंग एचपी1 प्राइमरी सेन्सर आहे. या मोबाईलमध्ये 50-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 2x ऑप्टिकल झूम सपोर्टसह 12-मेगापिक्सेल टेलीफोटो लेन्स देखील आहेत. सेल्फीसाठी मोटोच्या या फोनमध्ये 60 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. 

यात 125W वायर्ड फास्ट चार्जिंगसाठी 4610mAh बॅटरी आहे. बॅटरी 50W वायरलेस चार्जिंग आणि 10W रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. फोनचे वजन 198.5 ग्रॅम आहे. 

Web Title: Motorola to Bring Edge 30 Ultra New Look with 200MP Camera Learn Features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.