Moto Edge सीरीजमध्ये येणार तीन दमदार स्मार्टफोन; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

By सिद्धेश जाधव | Published: June 19, 2021 02:43 PM2021-06-19T14:43:16+5:302021-06-19T14:45:10+5:30

Motorola Edge series specs: Moto Edge सीरिजमधील तीन स्मार्टफोन्सची माहिती लीकच्या माध्यमातून समोर आली आहे.  

Motorola will launch moto edge berlin edge kyoto and edge pstar soon  | Moto Edge सीरीजमध्ये येणार तीन दमदार स्मार्टफोन; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

हा प्रतीकात्मक फोटो आहे.

Next

Motorola लवकरच Moto Edge सीरिजमध्ये तीन नवीन स्मार्टफोन लाँच करू शकते. मोटोरोलाचे हे स्मार्टफोन्स Motorola Edge Berlin, Motorola Edge Kyoto, आणि Motorola Edge Pstar या कोडेनेम्ससह समोर आले आहेत, अशी माहिती Techniknews ने दिली आहे. यातील Motorola Edge Berlin मध्ये Snapdragon 778G चिपसेटस असेल तर Motorola Edge Pstar स्मार्टफोन Snapdragon 870 किंवा Snapdragon 865 चिपसेटसह सादर करण्यात येईल. या सीरिजमधील स्मार्टफोन्सच्या किंमतीची अजून कोणतीही माहिती समोर आली नाही.  

Motorola Edge Berlin चे स्पेसिफिकेशन्स 

Moto Edge Berlin मध्ये Snapdragon 778G SoC सह 6GB/8GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेजस असेल. ट्रिपल कॅमेऱ्यासह येणाऱ्या या फोनच्या युरोपियन मॉडेलमध्ये 108MP चा मुख्य कॅमेरा, 16MP अल्ट्रा वाइड सेन्सर आणि 8MP चा टेलीफोटो सेन्सर मिळेल. तर, नॉर्थ अमेरिकन व्हेरिएंट 108MP प्राइमरी कॅमेरा, 8MPअल्ट्रावाइड/मॅक्रो लेंस आणि 2MP लेंससह सादर केला जाईल. या दोन्ही व्हेरिएंटमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा असेल.  

Motorola Edge Pstar चे स्पेसिफिकेशन्स 

Motorola Edge Pstar स्मार्टफोनमध्ये Snapdragon 870 किंवा Snapdragon 865 चिपसेट देण्यात येईल. मोटोरोलाचा हा फोन 6GB/8GB/12GB रॅम ऑप्शनसह 256GB पर्यंतच्या स्टोरेजसह सादर करण्यात येईल. Motorola Edge Pstar मध्ये Moto Edge Berlin सारखा रियर कॅमेरा सेटअप मिळेल. परंतु यातील फ्रंट कॅमेरा 16MP किंवा 32MP चा असू शकतो. 

Motorola Edge Kyoto चे स्पेसिफिकेशन्स 

Motorola Edge Kyoto स्मार्टफोन या सीरीजचा सर्वात अफोर्डेबल स्मार्टफोन असू शकतो. या फोनचा कॅमेरा सेटअप Motorola Berlin आणि Pstar सारखा असेल. 108MP च्या मुख्य कॅमेऱ्यासोबत या फोनमध्ये 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2MP डेप्थ कॅमेरा देण्यात येईल. मोटोरोलाच्या या स्मार्टफोनच्या रॅम, स्टोरेज आणि चिपसेटची अजूनतरी कोणतीही माहिती समोर आली नाही. 

Web Title: Motorola will launch moto edge berlin edge kyoto and edge pstar soon 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.