भन्नाट! हवेतून एकत्र 4 फोन चार्ज करणार मोटोरोलाची वायरलेस चार्जिंग; टेक्नॉलॉजीची चाचणी सुरु 

By सिद्धेश जाधव | Published: November 10, 2021 06:53 PM2021-11-10T18:53:32+5:302021-11-10T18:55:48+5:30

मोटोरोला नव्या वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीवर काम करत आहे. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने हवेतून डिवाइस चार्ज करता येतील.  

Motorolas new space charging tech can wirelessly charge up to 4 phones simultaneously  | भन्नाट! हवेतून एकत्र 4 फोन चार्ज करणार मोटोरोलाची वायरलेस चार्जिंग; टेक्नॉलॉजीची चाचणी सुरु 

भन्नाट! हवेतून एकत्र 4 फोन चार्ज करणार मोटोरोलाची वायरलेस चार्जिंग; टेक्नॉलॉजीची चाचणी सुरु 

googlenewsNext

सध्या उपलब्ध असलेल्या वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीमध्ये स्मार्टफोन एका चार्जींग पॅडवर विशिष्ट ठिकाणी ठेवावा लागतो. परंतु आता स्मार्टफोन कंपन्या पुढच्या पिढीच्या वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजीवर काम करत आहेत. यात शाओमी आणि मोटोरोला आघडीवर असल्याचे दिसत आहे.  

लेनोवोच्या मालकीची स्मार्टफोन कंपनी मोटोरोला 'मोटोरोला स्पेस चार्जिंग' टेक्‍नॉलजीवर काम करत आहे. हा एक ओव्हर-द-एयर वायरलेस चार्जिंग कॉन्सेप्ट आहे. ज्यात चार्जर आणि स्मार्टफोनचा कोणताही संपर्क न होता डिवाइस चार्ज करता येतो. शाओमीने देखील असा प्रयोग केला आहे परंतु मोटोरोलाची टेक्नॉलॉजीमध्ये काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत.  

मोटोरोलाने या प्रयोगाची सुरुवात यावर्षीच्या सुरुवातीला केली होती. परंतु ही टेक्नॉलॉजी सर्वांच्या वापरासाठी कधी खुली होईल हे मात्र अजूनही अस्पष्ट आहे. काही दिवसांपूर्वी मोटोरोलाच्या या अनोख्या टेक्नॉलॉजीचे काही फीचर्स Weibo वर लिस्‍ट करण्यात आले होते.कंपनीची ही स्पेस चार्जिंग टेक्नॉलॉजी एक मीटरच्या भागात वापरता येईल. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने तीन मीटरच्या भागातील चार फोन चार्ज करता येतील, अशी माहिती देखील रिपोर्टमधून मिळाली होती. मोटोरोलाने या प्रयोगाचा एक विडियो देखील युट्युबवर अपलोड केला आहे.  

स्मार्टफोन आणि चार्जिंग सोर्समध्ये कितीही अडथळे आले तर या टेक्नॉलॉजीने डिवाइस चार्ज केला जाईल. तसेच ठराविक भागात मानवी शरीर आल्यास चार्जिंग बंद होईल. सर्वांसाठी ही टेक्नॉलॉजी उपलब्ध करवून देण्याच्या आधी खूप चाचण्या कराव्या लागतील आणि याची तयारी केली जात आहे.  

Web Title: Motorolas new space charging tech can wirelessly charge up to 4 phones simultaneously 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.