मोटोरोलाचा पी 30 नोट येणार; चीनमध्ये लाँच; 5000 एमएएचची बॅटरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 21:27 IST2018-09-03T21:25:38+5:302018-09-03T21:27:05+5:30

मोटोरोलाचा पी 30 नोट येणार; चीनमध्ये लाँच; 5000 एमएएचची बॅटरी
नवी दिल्ली : लिनोवो कंपनीच्या अधिपत्याखाली आलेल्या मोटोरोला कंपनीने पी30 नंतर पी30 नोट हा दमदार स्मार्टफोन लाँच केला आहे. दिसायला जरी दोन्ही फोन सारखेच असले तरीही दोन्हीमध्ये बराच वेगळेपणा आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे यामध्ये 5000 एमएएचची बॅटरी दिली आहे.
मोटोरोला पी30 नोट 4 जीबीच्या मोबाईलची किंमत 1999 चिनी युआन (20,700 रुपये) आहे. 6 जीबी रॅमच्या फोनची किंमत 2,299 युआन (23,800 रुपये) आहे. या स्मार्टफोनला मर्क्युरी ब्लॅक कलरमध्येही लाँचे केले गेले आहे. सध्या हा फोन चीनमध्ये उपलब्ध होणार असला तरीही भारतातही लवकरच येण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये व्हर्टीकल ड्युअल कॅमेरा सेटअप, पाठीमागे फिंगरप्रिंट सेंसर आणि 3.5 एमएम हेडफोनसाठी जॅक असणार आहे.
नोटमध्ये काय काय....
मोटोरोला पी30 नोटमध्ये 6.2 इंचाचा फुल एचडी प्लस 2.5 डी कर्व्हड ग्लास डिस्प्ले आहे. या स्क्रीनचा अस्पेक्ट रेशो 19:9 आहे. 1.8 गीगीहर्ट्झ स्पीडचा 636 स्नॅपड्रॅगन ऑक्टा कोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. इनबिल्ट स्टोरेज 64 जीबी असून ते मेमरी कार्डद्वारे 256 जीबी पर्यंत वाढविता येते.
नोटमध्ये 16 मेगापिक्सल प्रायमरी आणि 5 मेगापिक्सल सेकंडरी असा ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. तर पुढील बाजुला 12 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. या फोनचे वजन 198 ग्रॅम आहे.