Motorolla G6 Plus आला; पाय ही नवी ऑपरेटिंग सिस्टिमही मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 04:00 PM2018-09-13T16:00:24+5:302018-09-13T16:27:58+5:30

जागतिक स्तरावर पाच महिन्यांपूर्वीच हा फोन ब्राझीलमध्ये लाँच करण्यात आला होता.

motorolla g6 plus launched; The newest operating system Pie will be available soon | Motorolla G6 Plus आला; पाय ही नवी ऑपरेटिंग सिस्टिमही मिळणार

Motorolla G6 Plus आला; पाय ही नवी ऑपरेटिंग सिस्टिमही मिळणार

Next

नवी दिल्ली : लिनोवो कंपनीच्या मालकीचा ब्रँड मोटोरालाने आज नवीन मिडरेंज स्मार्टफोन लाँच केला. Moto G6 Plus असे या फोनचे नाव असून जागतिक स्तरावर पाच महिन्यांपूर्वीच हा फोन ब्राझीलमध्ये लाँच करण्यात आला होता. भारतात या फोनची किंमत 22,499 रुपये ठेवण्यात आली आहे. 


5.93 इंचाचा डिस्प्ले 
Moto G6 Plus या फोनमध्ये 5.93 इंचाचा डिस्प्ले आहे. या स्क्रीनचा रेशो 18:9 असा आहे. फोनमध्ये 2.2 गीगाहर्ट्झचा स्नॅपड्रगन ऑक्टाकोअर 630 प्रोसेसर देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 64 जीबीची मेमरी स्पेस आहे. मायक्रो एसडी कार्डद्वारे ही मेमरी 256 जीबीपर्यंत वाढविण्यात येणार आहे. स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड ओरियो ही ऑपरेटींग सिसि्टम देण्य़ात आली आहे. कंपनी लवकरच पाय ही नवी ऑपरेटींग सिस्टिम देणार आहे. 


पाठीमागे ड्युअल टोन एलईडी फ्लॅश ड्युअल कॅमेरा देण्यात आला आहे. 12 एमपी आणि 5 एमपी असे दोन कॅमेरे आहेत. मोठा कॅमेरा f/1.7 अपार्चरचा आहे. जास्त अपार्चरमुळे कमी उजेडातही चांगले फोटो काढता येतात. तर सेल्फीसाठी पुढे एलईडी फ्लॅशसह 16एमपी कॅमेरा देण्यात आलेला आहे. तसेच यामध्ये गुगल लेन्स, स्पॉट कलर, लँडमार्क ओळखणे, फेस अनलॉक सारख्या सुविधाही देण्यात आल्या आहेत. तसेच 3200 एमएएचची बॅटरीही देण्यात आली आहे. 


मोटोरोलाच्या या स्मार्टफोनची विक्री अॅमेझॉनवर उपलब्ध करण्यात आला आहे.

Web Title: motorolla g6 plus launched; The newest operating system Pie will be available soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.