4G, 5G ला विसरा आता 6G येणार, 'या' देशात इंटरनेट सुस्साट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 01:44 PM2020-01-21T13:44:07+5:302020-01-21T13:49:42+5:30

2G, 3G, 4G आणि 5G नंतर आता 6G इंटरनेट सेवा लाँच करण्याची तयारी सुरू झाली आहे.

Move over 5G, Japan plans to launch 6G | 4G, 5G ला विसरा आता 6G येणार, 'या' देशात इंटरनेट सुस्साट

4G, 5G ला विसरा आता 6G येणार, 'या' देशात इंटरनेट सुस्साट

Next
ठळक मुद्दे2G, 3G, 4G आणि 5G नंतर आता 6G इंटरनेट सेवा लाँच करण्याची तयारी सुरू झाली आहे. जपानने 6G  नेटवर्कसाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत.6G चं नेटवर्क हे 5G पेक्षा 15 पटीने वेगवान असून 2030 पर्यंत ते लाँच करण्यात येणार आहे.

टोकियो - जगभरात इंटरनेटचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. 2G, 3G, 4G आणि 5G नंतर आता 6G इंटरनेट सेवा लाँच करण्याची तयारी सुरू झाली आहे. जगभरात सध्या 5G चे नेटवर्क मजबूत करण्यासाठी विविध गोष्टी केल्या जात असताना जपानने मात्र 6G  नेटवर्कसाठीचे प्रयत्न सुरू केले आहेत. लाँच करण्यात येणारं 6G चं नेटवर्क हे 5G पेक्षा 15 पटीने वेगवान असणार असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगभरात अनेक देशांनी 5G नेटवर्कसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. जपानमध्ये इंटरनेटचा वेग कमाल असून लवकरच ते 6G नेटवर्क आणणार आहेत. 6G चं नेटवर्क हे 5G पेक्षा 15 पटीने वेगवान असून 2030 पर्यंत ते लाँच करण्यात येणार आहे. या नेटवर्कसाठी जपानने मिनिस्ट्री ऑफ इंटरनल अफेयर्स अँड कम्यूनिकेशन्स ऑफ जपान गव्हर्नमेंट सिविलियन सोसायटी ऑफ रिसर्चची स्थापना केली आहे. 6G नेटवर्क विकसित करण्यासाठी आर्थिक तरतूदही करण्यात आली आहे. 

दक्षिण कोरिया, फिनलँड आणि चीनदेखील 5G पेक्षा अधिक वेगवान असलेलं 6G नेटवर्क तयार करण्याच्या प्रयत्न करत आहेत. 6G चं नेटवर्क किती वेगवान असतं हे समजून घेण्यासाठी 5G ची माहिती असणं गरजेचं आहे. 5G नेटवर्क हे 4G पेक्षा 20 पटीने अधिक वेगवान असणार आहे. या नेटवर्कच्या मदतीने  एक पूर्ण एचडी चित्रपट अवघ्या काही सेकंदात डाउनलोड करता येणार आहे. भविष्यात स्वयंचलित कारमध्ये देखील 5G चा वापर केला जाणार आहे. 

चीनमध्ये तीन सरकारी कंपन्यांनी 1 नोव्हेंबर रोजी 5G सेवा सुरू केली आहे. चायना मोबाईलने बीजिंग, शांघाय आणि शेनझेनसमवेत 50 शहरांमध्ये 5G सेवा सुरू करत असल्याची घोषणा केली होती. ग्राहकांना यासाठी दरमहा 128 युआन म्हणजे जवळपास 1300 रुपये मोजावे लागणार आहेत. 5G सेवेसाठी चीनमध्ये प्रमुख स्पर्धक कंपन्या असणाऱ्या चायना टेलिकॉम आणि चायना युनिकॉर्न यांनीही ग्राहकांसाठी विविध योजना आणि ऑफर्स देत 5G सेवा सुरू केली आहे. बीजिंगमध्ये झालेल्या तंत्रज्ञान परिषदेत अधिकाऱ्यांनी तीन सरकारी कंपन्या 'फाइव्ह जी' सेवेची सुरुवात करणार असल्याची घोषणा केली होती. 

'या' बातम्याही नक्की वाचा

Airtel Plan : एअरटेलच्या 'या' प्रीपेड प्लॅनवर मिळणार 2 लाखांचा विमा आणि बरंच काही...

Instagram टिकटॉकला टक्कर देणार, बुमरँगमध्ये नवीन फीचर्स मिळणार

Whatsapp Web वरचे 'हे' खास फीचर्स माहीत आहेत का?

आता स्मार्टफोनला करा टीव्हीचा रिमोट; कसं ते जाणून घ्या

जगातील सर्वात छोटा 3G स्मार्टफोन लाँच; वजन फक्त 31 ग्रॅम, जाणून घ्या खासियत

 

Web Title: Move over 5G, Japan plans to launch 6G

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.