हॅकर्सच्या निशाण्यावर MS Office युजर्स; ६२ देशांना केलं लक्ष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 01:14 PM2020-07-08T13:14:30+5:302020-07-08T13:23:47+5:30
तुम्ही सुद्धा मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा वापर करत असाल, तर अशा खोट्या ईमेलपासून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.
नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे (Microsoft Office) युजर्स हॅकर्सच्या निशाण्यावर आहेत. मायक्रोसॉफ्टच्या म्हणण्यानुसार, हॅकर्सनी ६२ देशांमधील युजर्संना लक्ष्य केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हॅकर्स डिसेंबर २०१९ पासून मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या युजर्स लक्ष्य करत आहेत. हॅकर्स सध्या फिशिंग ईमेलद्वारे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
तुम्ही सुद्धा मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा वापर करत असाल, तर अशा खोट्या ईमेलपासून सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. मायक्रोसॉफ्टने मंगळवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. हॅकर्संकडून हा घोटाळा मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात होता. ज्यामुळे मायक्रोसॉफ्ट ऑफिस ३६५ युजर्स याला बळी पडले असते, असे कंपनीने म्हटले आहे.
हॅकर्स लाखो युजर्संना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत
मायक्रोसॉफ्टने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, ही फिशिंग कॅम्पेन मोठ्या प्रमाणात राबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हॅकर्सनी एका आठवड्यात मायक्रोसॉफ्ट ऑफिस ३६५ युजर्सचे अकाऊंटमध्ये फेरफार करण्यासाठी प्रयत्न केला.
हॅकर्स व्यावसायिकांना लक्ष्य करत होते
या फिशिंग कॅम्पेनद्वारे मायक्रोसॉफ्ट युजर्स असलेल्या जगभरातील अनेक व्यावसायिकांच्या मायक्रोसॉफ्ट ऑफिस अकाऊंटमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होते. या व्यावसायिकांच्या वायर ट्रान्सफरकडेही हॅकर्स नजर ठेवून बसले होते.
मायक्रोसॉफ्टकडून हॅकर्सची नांगी आवळली
मायक्रोसॉफ्टने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे की, कोर्टाची परवानगी घेऊन हॅकर्सकडून वापरण्यात येत असलेले डोमेन ताब्यात घेतले आहेत. या डोमेनचा वापर फिशिंग ईमेल पाठविण्यासाठी केला जात होता.
बनावट ईमेल पाठविणारे हॅकर्स
मायक्रोसॉफ्टच्या म्हणण्यानुसार, हॅकर्स युजर्संना फसवण्यासाठी बनावट डोमेन वापरतात, ज्यामध्ये ते स्वत: ला मोठ्या कंपनीचे कर्मचारी असल्याचे सांगतात. हॅकर्स ईमेलद्वारे अॅप्लिकेशन्स पाठवतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे अॅप्लिकेशन्स बर्यापैकी 'फॅमिली लुकिंग' असतात.
आणखी बातम्या...
मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्याची विरोधकांची मागणी न्यायालयाने फेटाळली - अशोक चव्हाण
"सारथीच्या उद्घाटनाची बिले थकवणाऱ्यांनी संस्था कशी चालवायची ते शिकवू नये"
'त्यांना वाटतंय तसं नाहीय', रोहित पवारांकडून देवेंद्र फडणवीसांना चोख प्रत्युत्तर
घुसखोरी केली नाही, तर चिनी सैन्य माघार कशी घेत आहे? असदुद्दीन ओवेसींचा सवाल
अवघ्या ५ वर्षांच्या दिव्यांगाने १० किमी चालून रुग्णालयासाठी जमवला ९ कोटींचा निधी