व्हिडीओ कॉल सुरू असतानाही करा मल्टिटास्किंग; WhatsApp नं आणलं नवं फिचर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 09:51 AM2022-12-07T09:51:22+5:302022-12-07T09:51:45+5:30
व्हॉटस्ॲपच्या नवे फिचरमध्ये व्हिडीओ कॉलिंगदरम्यान पिक्चर-इन-पिक्चर मोडची सुविधा वापरकर्त्यांना मिळणार आहे.
नवी दिल्ली : मेटाच्या मालकीचा इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हाॅटस्ॲपने व्हिडीओ कॉलिंग अनुभव अधिक समृद्ध करण्यासाठी मल्टिटास्किंग फिचर आणले आहे. या फिचरच्या मदतीने व्हॉटस्ॲप व्हिडीओ कॉलिंग सुरू असतानाच इतर ॲपचा वापर करता येणार आहे. अर्थात मल्टिटास्किंग करता येणार आहे. सध्या हे फिचर चाचणीच्या प्रक्रियेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
व्हॉटस्ॲपच्या आगामी फिचरवर नजर ठेवणारी वेबसाइट ‘वाबेटाइन्फो’ने ही माहिती दिली आहे. व्हॉटस्ॲप सातत्याने नवे फिचर आणण्याच्या प्रयत्नात असते. त्याचाच एक भाग म्हणून व्हिडीओ कॉलिंग मल्टिटास्किंग फिचर ही नवी सुविधा आणली जात आहे.
व्हॉटस्ॲपच्या नवे फिचरमध्ये व्हिडीओ कॉलिंगदरम्यान पिक्चर-इन-पिक्चर मोडची सुविधा वापरकर्त्यांना मिळणार आहे. याद्वारे व्हिडीओ कॉलिंगदरम्यान अन्य ॲपचा वापर करता येऊ शकेल. पिक्चर-इन-पिक्चर मोडमध्ये वापरकर्ते इतर ॲप उघडू शकतील
व त्याच वेळी व्हिडीओ कॉलिंग सुरू ठेवू शकतील. सोप्या भाषेत वापरकर्त्यांना व्हिडीओ कॉलिंगदरम्यान मल्टिटास्किंग करता येईल.