अरेरे! ट्विट करणं महिलेला पडलं महागात, गमावले तब्बल 64 हजार; तुम्हीही 'ही' चूक करता का?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 03:29 PM2023-01-03T15:29:04+5:302023-01-03T15:34:12+5:30
एका महिलेने 64,000 रुपये गमावले आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर हल्ली मोठ्या प्रमाणात केला जातो. तुम्हाला बातम्या किंवा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर हवे असल्यास, प्रत्येकजण फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम सारखे प्लॅटफॉर्म वापरतो. तसे ते खूप फायदेशीर आहे. पण कधी कधी ते खूप घातकही ठरते. हॅकर्स नेहमी तुमच्यावर लक्ष ठेवतात. अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यात हॅकर्सनी एका महिलेचे 64 हजार रुपये चोरले आहेत. या महिलेने तिच्या अपकमिंग रेल्वे तिकिटाची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती.
मुंबईतील विलेपार्ले येथील एका महिलेने 64,000 रुपये गमावले आहेत. याबाबत महिलेने IRCTC वर तक्रार केली. एका रिपोर्टनुसार, एमएन मीना यांनी 14 जानेवारीला भुजला जाण्यासाठी IRCTC साइटवर तीन तिकिटे बुक केली होती. मात्र, सर्व जागा आरक्षित होत्या. त्यामुळे त्याला RAC सीट मिळाली. तिकीट कन्फर्म होईल की नाही या संभ्रमात महिला होती म्हणून तिने तिच्या ट्रेन तिकिटांचा तपशील आणि मोबाईल नंबर ट्विटरवर पोस्ट केला आणि IRCTC ची मदत मागितली.
काही वेळाने महिलेचा फोन आला आणि त्यांनी स्वतःची ओळख IRCTC चा कस्टमर केअर ऑफिसर म्हणून दिली. हा फोन महिलेच्या मुलाने उचलला होता, त्यामुळे हॅकरने महिलेच्या फोनवर लिंक पाठवली आणि तिला दोन रुपये भरण्यास सांगितले. मीना आणि तिचा मुलगा दोघांना वाटले की, त्यांनी ट्विटरवर त्यांची तक्रार पोस्ट केल्यामुळे IRCTC त्यांच्याशी संपर्क साधला आहे. जास्त विचार न करता त्यांच्या मुलाने दोन रुपये पाठवले. यानंतर त्यांच्या खात्यातून बॅक टू बॅक पेमेंटचे अलर्ट मिळाले. अशा प्रकारे त्यांच्या खात्यातून 64,011 रुपये चोरीला गेले.
महिलेने ट्विटरवर लिहिले, “माझ्या मुलाने कॉलरवर पूर्ण विश्वास ठेवला कारण आम्ही IRCTC च्या ट्विटर पेजवर तक्रार केली. कॉलरने दावा केला की तो IRCTC कस्टमर केअर आहे आणि आमचे तिकीट कन्फर्म करण्याचे आश्वासन दिले. त्याच्या विनंतीवरून 2 रुपये दिले आणि नंतर आमच्या खात्यातून 64,011 रुपये काढण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॅकर्सनी फिशिंग लिंकद्वारे मीना यांचे बँक खाते आणि UPI सिक्युरिटी कोडचे तपशील चोरले आणि नंतर ही घटना घडली.
सायबर फ्रॉडपासून असा करा बचाव
खात्याचा तपशील कोणालाही देऊ नका. तसेच, एखाद्याच्या विनंतीवर कोणत्याही लिंकवर पैसे देऊ नका. ज्याप्रकारे मीना य़ांच्यासोबत सायबर फसवणूक झाली, तुम्ही खबरदारी न घेतल्यास तुम्हीही त्याचा बळी होऊ शकता. फिशिंग लिंक किंवा कोणत्याही अज्ञात लिंकवर पैसे देऊ नका. अशा मेसेज किंवा कॉल्सपासून सावध राहा. तसेच, तुमची वैयक्तिक माहिती ऑनलाइन शेअर करू नका. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, हॅकर्सनी मीना यांचे बँक खाते आणि UPI सुरक्षा कोडची माहिती फिशिंग लिंकद्वारे चोरली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"