नोटपॅडच्या दोन अफलातून ट्रीक्स
By शेखर पाटील | Published: July 31, 2017 06:19 PM2017-07-31T18:19:48+5:302017-07-31T18:22:49+5:30
नोटपॅडचा वापर फक्त टेक्स्ट एडिटर म्हणूनच करता येत नसून याच्या मदतीने काही मजेशीर ट्रीक्स सुध्दा करता येतात. यापैकी दोन ट्रीक्स खालीलप्रमाणे आहेत.
नोटपॅडचा वापर फक्त टेक्स्ट एडिटर म्हणूनच करता येत नसून याच्या मदतीने काही मजेशीर ट्रीक्स सुध्दा करता येतात. यापैकी दोन ट्रीक्स खालीलप्रमाणे आहेत.
मॅट्रीक्स इफेक्ट...
आपल्याला मॅट्रीक्स इफेक्ट माहित असेलच. ० आणि १ या बायनरी तर ० ते ९ या क्रमांकांना गतीमान पध्दतीने दर्शविण्याचा हा प्रकार मनोरंजक मानला जातो. आपण नोटपॅडची ट्रीक वापरून हा इफेक्ट पाहू शकतो. यासाठी खालील पध्दतीने क्रमाक्रमाने सांगितले तसे करा.
१) नोटपॅड ओपन करा
२) नोटपॅडमध्ये खाली नमूद केलेला कोड टाका.
@echo off
color 02
:start
echo %random% %random% %random% %random% %random% %random% %random% %random% %random% %random%
goto start
३) संबंधीत फाईल test.bat या नावाने सेव्ह करा.
यानंतर आपण ही फाईल जिथे सेव्ह केली आहे तिथे जाऊन डबल क्लिक केल्यानंतर आपल्याला नोटपॅडमध्ये अतिशय चित्तथरारक असा मॅट्रीक्स इफेक्ट दिसेल.
पर्सनल डायरी म्हणून उपयोग...
नोटपॅडला आपण पर्सनल डायरी म्हणून वापरू शकतो. अर्थात कोणत्या दिवशी आणि कोणत्या वेळेला नेमके काय लिहले? ही बाब यासाठी आवश्यक आहे. यासाठी खाली नमूद केल्यानुसार करा.
१) नोटपॅड ओपन करा.
२) नोटपॅडमध्ये .LOG हे शब्द टाईप करा.
३) संबंधीत फाईल log.txt या नावाने सेव्ह करा.
यानंतर आपण ही फाईल ओपन केल्यानंतर नोटपॅडमध्ये तारीख आणि वेळ नमूद केलेले असल्याचे आपल्याला दिसेल. अर्थात या नोटपॅडमध्ये आपण डायरीसारखे लिखाण करू शकतो. यानंतर आपण जेव्हाही ही नोटपॅडची फाईल उघडाल तेव्हा आपल्याला तेव्हाची तारीख आणि वेळ दिसेल. म्हणजेच आपण एखाद्या डायरीप्रमाणे याचा वापर करू शकतो.
याप्रमाणे नोटपॅडला आपण विविध प्रकारे अत्यंत मनोरंजक पध्दतीने वापरू शकतो. मात्र या ट्रीक्स कधी तरी !