संगणकाची गरज आता मोबाईलवरच भागणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 10:40 PM2019-08-21T22:40:46+5:302019-08-21T22:43:57+5:30
नागरिकांची संगणकाद्वारे होणारी बहुतांश कामे मोबाईल मधूनच करता येणे शक्य होणार आहे.
नवी मुंबई : नागरिकांची संगणकाद्वारे होणारी बहुतांश कामे मोबाईल मधूनच करता येणे शक्य होणार आहे. तशा पद्धतीचे मोबाईल येत्या काही दिवसात बाजारात उपलब्ध होणार असून ग्राहकांनाही त्याची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे सॅमसंग ने आघाडी घेतल्याने भारतात येत्या काळात मोबाईल कंपन्यांमध्ये स्पर्धा वाढून तंत्रज्ञानात क्रांती घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मागील काही वर्षात मोबाईलने मानवी जीवनात महत्वाचा घटक म्हणून स्थान मिळवले आहे. येत्या काळात त्यात अधिक चांगले बदल होणार असून, त्यामुळे अनेकांच्या जीवनातून संगणक हद्दपार होऊन त्याची जागा मोबाईल फोन घेणार आहे. त्याच उद्देशाने शुक्रवार पासून भारतात सॅमसंग ने गॅलेक्सी नोट १० व १० प्लस हे दोन मोबाईल लॉन्ज केले आहेत. शुक्रवार पासून ते बाजारात उपलब्ध होणार असून, त्याच्यातील फीचर्सने मोबाईल ग्राहकांमध्ये खळबळ माजवली आहे.
१० व १२ जीबी च्या रॅम सह या फोनमध्ये ५१२ जीबी ची मेमरी मिळणार आहे. ती १ टीबी पर्यंत वाढवली जाऊ शकते. त्याशिवाय संगणकामध्ये केली जाणारी अनेक कामे या मोबाईल मध्ये करता येणार आहेत. त्यामुळे व्यावसायिक, विद्यार्थी यांना हा मोबाईल उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास सॅमसंग चे दक्षिण आशियाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी एच. सी. हाँग यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या हस्ते या दोन्ही मोबाईलचे लॉंचिंग बेंगळुरू येथील सॅमसंग ओपेरा हाऊस मध्ये मंगळवारी करण्यात आले. यावेळी त्यांनी मोबाईल ग्राहकांच्या गरजांचा आढावा घेऊनच सॅमसंग ने हे दोन फोन बाजारात आणल्याचे सांगितले. यामुळे कार्यालयीन तसेच शैक्षणिक कामासाठी लॅपटॉप अथवा संगणकावर आधारित राहण्याची गरज भासणार नाही असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. त्याकरिता सॅमसंग ने मायक्रोसॉफ्ट सोबत भागेदारी केलेली आहे.
या फोनमधील सर्वात आकर्षणीय बाब म्हणजे त्याचा पेन. या पेनद्वारे फोन मध्ये लिहिण्याशिवाय त्याचा वापर रिमोट प्रमाणे सेल्फी काढण्यासह इतर कामासाठी देखील करता येणार आहे. शिवाय पेनद्वारे मोबाईल मध्ये लिहिलेल एखाद वाक्य डिजिटल मध्ये रूपांतरित करता येणार आहे. हिंदी, मराठी, इंग्रजी व उर्दू या चार भाषांमध्ये हे ट्रान्सलेशन शक्य होणार आहे. तर चार्जिंग साठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. त्याद्वारे अवघ्या अर्ध्या तासात मोबाईल चार्जिंग होणार आहे. ज्यांना फोटो आणि व्हिडीओ यासाठी मोबाईल वापरायचा आहे, त्यांच्यासाठी नोट १० अथवा १० प्लस हे डिजिटल कॅमेरा पेक्षा उपयुत्क ठरू शकतात.
तर व्हिडीओ काढताना झूम इन साउंड या फीचर्स द्वारे गर्दी मधून ठराविक व्यक्तीलाच झूम केल्यास व्हिडीओ मध्ये केवळ त्याच व्यक्तीचा आवाज रेकॉर्ड होणार आहे. याकरिता मोबाईल मध्ये तीन कॅमेरे देण्यात आले असून त्या प्रत्येकाचे स्वतंत्र वैशिष्ट्य नवनवीन अनुभव देणार आहेत. त्याशिवाय मोबाईल मध्येच व्हिडीओ एडिटिंग सह इतरही अनेक गोष्टीत करता येणे शक्य होणार आहे.सॅमसंगच्या माध्यमातून भारतात प्रथमच एआर डोडल हे फिचर मोबाईलमध्ये उपलब्ध झाले आहे.