WhatsApp किंवा Telegram नव्हे तर 'ही' सर्व्हिस अमेरिकेत सर्वाधिक लोकप्रिय!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 12:40 PM2022-02-07T12:40:30+5:302022-02-07T12:41:14+5:30
Short Messaging Service : SMS ची सुरूवात 1980 मध्ये झाली होती आणि यावर अमेरिकन लोकांनी विश्वास ठेवला आहे.
जगभरातील लोक WhatsApp, WeChat, Telegram आणि इतर इन्स्टंट मेसेजिंग अॅप्स वापरतात. चीनमध्ये WeChat आणि जपानमध्ये Line सारखी स्मार्टफोन अॅप्स खूप लोकप्रिय आहेत, परंतु अमेरिकन अजूनही एसएमएस (SMS) म्हणजेच शॉर्ट मेसेजिंग सर्व्हिसवर (Short Messaging Service) अवलंबून आहेत. SMS ची सुरूवात 1980 मध्ये झाली होती आणि यावर अमेरिकन लोकांनी विश्वास ठेवला आहे.
WhatsApp सह इतर इन्स्टंट मेसेजिंग अॅप्ससाठी इंटरनेट आवश्यक आहे, तर SMS फोन लाइनवर कार्य करते. मोबाइल रिसर्च फर्म Strategy Analytics नुसार, 2020 मध्ये अमेरिकेमध्ये 1 लाख कोटी खाजगी आणि व्यावसायिक SMS आणि MMS पाठवले गेले आहेत.
का लोकप्रिय आहे SMS?
Strategy Analytics मध्ये Wireless Media Research चे संचालक नितेश पटेल म्हणाले की, SMS आणि WhatsApp व्यतिरिक्त अमेरिकेत RCS (Rich Communications Services) देखील वापर करण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेत SMS खूप लोकप्रिय होण्याचे कारण म्हणजे ते सर्व फोनमध्ये उपलब्ध आहे. कारण, SMS ची सुविधा सर्व फीचर फोन, आयफोन आणि अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असल्याने त्याचा अधिक वापर करण्यात आला आहे. म्हणजेच SMS च्या मदतीने तुम्ही सर्व लोकांशी कनेक्ट राहू शकता.
दरम्यान, याचा एक मोठा तोटा सुद्धा आहे. SMS सर्व फोनवर वापरले जाऊ शकते, तर दुसरीकडे त्यात सुरक्षिततेची कमतरता देखील आहेत. त्यात मॉडर्न अॅप्ससारखे फीचर्सही मिळत नाहीत. अमेरिकन लोकांमध्ये SMS च्या लोकप्रियतेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की, अधिक सोयीस्कर टेक्नॉलॉजी हा सर्वोत्तम पर्याय असू शकत नाही. तसेच, हे देखील माहीत होते की, अमेरिकन लोकांची स्मार्टफोन वापरण्याची सवय जगातील इतर युजर्सपेक्षा वेगळी आहे.