डीटीएच व केबलवरूनही पाहता येणार नेटफ्लिक्स !

By शेखर पाटील | Published: December 15, 2017 03:01 PM2017-12-15T15:01:56+5:302017-12-18T16:04:24+5:30

नेटफ्लिक्स या ऑन डिमांड व्हिडीओ स्ट्रीमिंग सेवेने भारतातील डीटीएच कंपन्या आणि काही प्रमुख केबल ऑपरेटर्ससोबत करार केला असून या माध्यमातून याला थेट टिव्हीवर पाहता येणार आहे.

Netflix can be viewed from DTH and cable too! | डीटीएच व केबलवरूनही पाहता येणार नेटफ्लिक्स !

डीटीएच व केबलवरूनही पाहता येणार नेटफ्लिक्स !

googlenewsNext

भारतात व्हिडीओ ऑन डिमांड या प्रकारांमधील सेवा लोकप्रिय होऊ लागल्या आहेत. विशेषत: फोर-जी नेटवर्कमध्ये झालेली वाढ आणि विविध कंपन्यांच्या किफायतशीर प्लॅन्समुळे व्हिडीओजचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी या क्षेत्रातील आघाडीची कंपनी म्हणून ख्यात असणार्‍या नेटफ्लिक्सनेही भारतीय बाजारपेठेकडे गांभिर्याने पाहण्यास प्रारंभ केला आहे. सध्या अँड्रॉइड आणि आयओएस या प्रणालींसाठी नेटफ्लिक्स उपलब्ध आहे. यात बेसिक, स्टँडर्ड आणि प्रिमीयम असे तीन प्लॅन्स असून याची आकारणी अनुक्रमे दरमहा ५००, ६५० आणि ८०० रूपये इतकी आहे. याच्या जोडीला स्मार्ट टिव्हीवरूनही नेटफ्लिपक्स सेवेचा आनंद घेता येतो. मात्र स्मार्ट टिव्ही भारतीय बाजारपेठेत लोकप्रिय होत असले तरी याला मर्यादादेखील (विशेष करून जास्त मूल्यामुळे!) आहेत. यासाठी स्मार्ट टिव्हीवर याचे अ‍ॅप उपलब्ध करण्यात आले आहे. यामुळे थेट घरातील दूरचित्रवाणीच्या पडद्यावर आपली सेवा प्रदान करण्यासाठी नेटफ्लिक्स कंपनीने कंबर कसल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने देशातील डीटीएच सेवा प्रदान करणार्‍या कंपन्या आणि केबल ऑपरेटर्ससोबत करार करण्यात आले आहेत.

या करारामुळे लवकरच आपण घरातील टिव्हीच्या पडद्यावर थेट सेट टॉप बॉक्स अथवा केबलच्या माध्यमातून नेटफ्लिक्सवरील व्हिडीओ स्ट्रीमिंग पाहू शकतो. याचा थेट वापर करण्यासाठी काही डीटीएच कंपन्यांनी आपल्या रिमोट कंट्रोलवर नेटफ्लिक्स सेवेसाठी स्वतंत्र बटन देण्याची तयारीदेखील दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यातील एयरटेल आणि व्हिडीओकॉन डी२एच सेवांच्या रिमोट कंट्रोलवर नेटफ्लिक्सला स्थान मिळाले असून याचाच कित्ता अन्य कंपन्यादेखील गिरवण्याची शक्यता आहे. अर्थात स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉपच्या पलीकडे जात थेट दिवाणखान्यातील दूरचित्रवाणी संचावर आपला विस्तार करण्याची योजना नेटफ्लिक्स कंपनीने आखल्याचे यातून अधोरेखित झाले आहे.

नेटफ्लिक्स कंपनीने जानेवारी २०१६ मध्ये भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला होता. एका वर्षात या सेवेने पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. अलीकडची आकडेवारी उपलब्ध नसली तरी नेटफ्लिक्स सेवेला हॉटस्टार,  वूथ, अमेझॉन प्राईम व्हिडीओ व सोनी लिव्ह आदींकडून तगडे आव्हान असल्याचे दिसून येत आहे. टिव्हीवर नेटफ्लिक्स सेवा सुरू झाल्यास या स्पर्धेत अजून रंगत चढणार असल्याचे स्पष्ट आहे.
 

https://www.facebook.com/lokmat/videos/1533217576744764/

Web Title: Netflix can be viewed from DTH and cable too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.