Netflix ने लॉन्च केलं प्रोफाईल ट्रान्सफर फीचर, आता पासवर्ड शेअर करता येणार नाही; कसं ते जाणून घ्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2022 10:27 PM2022-10-18T22:27:25+5:302022-10-18T22:27:48+5:30

Netflix नं एक नवं फीचर आपल्या युझर्ससाठी आणलं आहे. Profile Transfer असं या फीचरचं नाव असून यातून नेटफ्लिक्स डेटा ट्रान्सफर करू शकता येणार आहे.

Netflix Launched Profile Transfer Feature Now Users Will Not Able To Share Password With Their Family And Friends | Netflix ने लॉन्च केलं प्रोफाईल ट्रान्सफर फीचर, आता पासवर्ड शेअर करता येणार नाही; कसं ते जाणून घ्या?

Netflix ने लॉन्च केलं प्रोफाईल ट्रान्सफर फीचर, आता पासवर्ड शेअर करता येणार नाही; कसं ते जाणून घ्या?

googlenewsNext

Netflix नं एक नवं फीचर आपल्या युझर्ससाठी आणलं आहे. Profile Transfer असं या फीचरचं नाव असून यातून नेटफ्लिक्स डेटा ट्रान्सफर करू शकता येणार आहे. या फीचरच्या माध्यमातून पासवर्ड शेअरिंग थांबवण्यास मदत होणार आहे. नेटफ्लिक्ससाठी पासवर्ड शेअरिंग ही मोठी समस्या आहे. या समस्येचा त्यांच्या महसुलावरही परिणाम होत आहे. यामुळे नेटफ्लिक्स हे थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. नेटफ्लिक्सने सबस्क्रिप्शनची संख्या कमी होण्यामागील मुख्य कारणांपैकी एक म्हणून पासवर्ड शेअरिंगचा उल्लेख केला आहे.

नेटफ्लिक्सने एका ब्लॉग पोस्टमध्ये नमूद केल्यानुसार आजपासून त्यांनी प्रोफाइल ट्रान्सफर फिचरची सुविधा सुरू केली आहे. या माध्यमातून यूझर्स त्यांचे सर्व नेटफ्लिक्स हिस्ट्री, सेव्ह केलेले गेम आणि इतर सेटिंग्जसह त्यांचे संपूर्ण प्रोफाइल ट्रान्सफर करू शकतात. हे फीचर आजपासून जगभरातील सर्व विद्यमान Netflix सदस्यांसाठी उपलब्ध करुन दिलं जाईल. 

तुम्ही Netflix सदस्य असल्यास तुमच्या खात्यावर प्रोफाइल ट्रान्सफर फीचर उपलब्ध होताच तुम्हाला ईमेलद्वारे सूचित केलं जाईल. तुम्ही तुमचं प्रोफाईल Netflix वर कसे ट्रान्सफर करू शकता याचीही माहिती जाणून घेऊयात. 

  • तुमच्या फोन किंवा ब्राउझरवर Netflix अॅप उघडा.
  • प्रोफाइल ट्रान्सफर करण्यासाठी, "ट्रान्सफर प्रोफाइल" वर जा.
  • होमपेजवर जा आणि नंतर ड्रॉपडाउन मेन्यूमधील आपल्या प्रोफाइल फोटोवर दिलेल्या पर्यायावरील सूचनांचे पालन करा.


१० कोटींहून अधिक यूझर्स पैसेच देत नाहीत
नवं फीचर नेटफ्लिक्स वापरकर्त्यांना इतरांकडून पासवर्ड घेण्याऐवजी स्वतःचं अकाऊंट तयार करण्यास प्रोत्साहित करणार आहे. आधीच्या एका अहवालानुसार, Netfinix ने माहिती दिली होती की या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने २ लाख यूझर्स गमावले आहेत, जे दुसऱ्या तिमाहीत २० लाखांपर्यंत पोहोचू शकतात. याशिवाय नेटफिनिक्सने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत १० कोटींहून अधिक यूझर्स सबस्क्रिप्शनसाठी पैसे देत नाहीत आणि दुसर्‍याकडून पासवर्ड घेऊन नेटफ्लिक्सची सुविधा वापरतात.

Web Title: Netflix Launched Profile Transfer Feature Now Users Will Not Able To Share Password With Their Family And Friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.