भारतात Netflix ने आणला स्वस्त आणि मस्त प्लॅन !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 02:13 PM2019-07-24T14:13:37+5:302019-07-24T14:14:06+5:30

Netflix कंपनीकडून या नवीन प्लॅनचे नाव गो मोबाइल ठेवले आहे.

netflix launches go mobile plan for india at rs 199 | भारतात Netflix ने आणला स्वस्त आणि मस्त प्लॅन !

भारतात Netflix ने आणला स्वस्त आणि मस्त प्लॅन !

googlenewsNext

नवी दिल्ली : Netflix गेल्या काही दिवसांपासून भारतासाठी काही नवीन प्लॅनची चाचणी करत आहे. आता कंपनीने  199 रुपयांचा गो मोबाइलचा नवीन प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना केवळ एसडी क्वालिटी मिळणार आहे. सोबतच ग्राहक फक्त एकाच स्क्रीनमध्ये या प्लॅनचा उपयोग करु शकतात. तसेच, या प्लॅनची मर्यादा एक महिन्यासाठी आहे. 

Netflix कंपनीकडून या नवीन प्लॅनचे नाव गो मोबाइल ठेवले आहे. हा प्लॅन फक्त एकाच स्क्रीनमध्ये स्मार्टफोन्समध्येच वापर होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कंपनी भारतात 250 रुपयांच्या प्लॅनचे टेस्टिंग स्मार्टफोन्ससाठी करत होती. दरम्यान, 199 रुपयांच्या नवीन प्लॅनला ग्राहक वापरताना टीव्हीमध्ये कास्ट करता येणार नाही.

भारतात कंपनीने वीकली प्लॅन सुद्धा टेस्टिंग केला होता. आता तर कंपनीने असे स्पष्ट केले आहे की, मंथली प्लॅन सुद्धा आणला जाणार आहे. नवीन 199 रुपयांचा प्लॅन हा जुना स्मार्टफोन आणि स्वस्त असलेल्या स्मार्टफोनवर वापरता येणार आहे. यामध्ये फक्त 480p वर SD कंटेंटचा सपोर्ट मिळणार आहे. तसेच, ग्राहकांना HD, 720p किंवा यापेक्षा जास्त रिजोल्यूशनवर कंटेट दिसणार नाही. 

कंपनीच्या माहितीनुसार, जगभराच्या तुलनेत भारतातील ग्राहक नेटफ्लिक्ससाठी स्मार्टफोन्सवर लॉग-इन करतात. भारतात पहिल्यांदा नेटफ्लिक्सच्या प्लॅनची सुरुवात 500 रुपये होती. यावेळी भारतीय मार्टेकमध्ये सर्वांत महाग ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म होता. नेटफ्लिक्सची टक्कर सर्वाधिक अॅमेझॉन प्राइम व्हिडीओंना होती. दरम्यान, अॅमेझॉन प्राइम व्हिडीओसाठी भारतात सुरुवातीची किंमत 129 रुपये आहे. 
 

Web Title: netflix launches go mobile plan for india at rs 199

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.