5 रुपयांत मिळणार Netflixचं सब्सक्रिप्शन, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 12:47 PM2020-02-22T12:47:06+5:302020-02-22T12:53:56+5:30
नेटफ्लिक्स इंडियाने भारतीय युजर्सला मोठा झटका दिला आहे.
नवी दिल्लीः नेटफ्लिक्स इंडियाने भारतीय युजर्सला मोठा झटका दिला आहे. आतापर्यंत पहिल्यांदा नव्या युजर्सला महिन्याभरासाठी नेटफ्लिक्स वापरणं मोफत मिळत होतं, परंतु आता असं होणार नाही. पहिल्या महिन्यापासून आपल्याला सब्सक्रिप्शनसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. Netflixनं याची माहिती आपल्या पोर्टलवर दिली आहे. मागील वर्षी नेटफ्लिक्सने मोबाइल वापरकर्त्यांसाठी मासिक योजना आणली, ज्याची किंमत 199 रुपये आहे.
5 रुपयांत कसं मिळणार नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन
नेटफ्लिक्सची ही ऑफर केवळ नवीन युजर्ससाठी आहे. उदाहरणार्थ, जर तुम्ही पहिल्यांदा नेटफ्लिक्स वापरणार असाल तर तुम्हाला पहिल्या महिन्याच्या सब्सक्रिप्शनसाठी 5 रुपये मोजावे लागणार आहे. त्यानंतर 199 रुपयांपासून 799 रुपयांपर्यंत प्लॅन निवडावे लागतील.
कंपनीकडून नव्या ऑफर्सची पुष्टी
गॅजेट्स 360च्या रिपोर्टनुसार, Netflixच्या प्रवक्त्यांनी या ऑफरची खात्री केलेली आहे. 5 रुपयांची प्रमोशनल ऑफर आहे. ज्यात नव्या युजर्सला सुरुवातीला 5 रुपयांचं सब्सक्रिप्शन द्यावं लागणार आहे. ही ऑफर्स सध्या काही युजर्सना उपलब्ध आहे.
गेल्या वर्षी लाँच केला होता स्वस्त प्लॅन
गेल्या वर्षी Netflixने मोबाइल युजर्ससाठी मासिक प्लॅन सादर केला होता, ज्यात 199 रुपयांचं सब्सक्रिप्शन आहे. या किमतीत युजर्सना एसडी क्वालिटी मिळणार आहे. एकाच स्क्रीनवर याचा वापर करता येतो. 199 रुपयांत एकाच फोनवर Netflixवर वापरता येणार आहे. कंपनीनं या प्लॅनचं नाव गो- मोबाइल ठेवलं आहे. या मोबाइल प्लॅनचा वापर स्मार्टफोन आणि टॅबलेटवर केला जाणार आहे. तसेच या प्लॅनमध्ये टीव्हीवर व्हिडीओ पाहता येणार नाही.