काय सांगता! Netflix वर Webseries पाहायला इंटरनेटची गरज नाही, फ्री'मध्ये सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 01:38 PM2023-03-27T13:38:26+5:302023-03-27T13:38:58+5:30

सध्या Netflix वर वेबसिरीज पाहण्यासाठी इंटरनेट जास्त प्रमाणात खर्च होते, पण आता विना इंटरनेट नेटफ्लिक्सवर वेबसीरिज पाहता येणार आहे.

netflix watch free web series movie without using internet wifi | काय सांगता! Netflix वर Webseries पाहायला इंटरनेटची गरज नाही, फ्री'मध्ये सुरू होणार

काय सांगता! Netflix वर Webseries पाहायला इंटरनेटची गरज नाही, फ्री'मध्ये सुरू होणार

googlenewsNext

सध्याच युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. आता पहिल्यासारखं चित्रपट गृहात जाऊन सिनेमा पाहण्याची गरज नाही. नवीन येणारा सिनेमा आता आपल्या मोबाईलवरुन पाहता येतो. यासाठी Netflix, Amazon, आणि Disney+Hotstar या सारखे प्लॅटफॉर्म आले आहेत. यावर आपण वेबसीरिज, चित्रपट पाहू शकतो. पण, यासाठी जास्त प्रमाणात इंटरनेट खर्च होत होते, आता Netflix वर व्हिडीओ पाहताना इंटरनेटची गरज नसणार आहे. 

नेटफ्लिक्समध्ये प्रत्येक युजरला 'डाउनलोड'चा पर्याय दिला जातो. तुम्हाला एखादा व्हिडीओ पहायचा असेल आणि तुमच्या इंटरनेटचा जास्त वापर होऊ नये असे वाटत असेल, तर तुम्ही फीचर वापरू शकता. तुम्ही जेव्हाही वायफाय क्षेत्रात असता तेव्हा तुम्ही कोणतीही वेब सिरीज डाउनलोड करू शकता. तसेच, जेव्हा जेव्हा वायफाय किंवा इंटरनेट ऍक्सेस नसेल तेव्हा तुम्ही हा व्हिडीओ ऑफलाइन देखील पाहू शकता. 

Redmi Note 12 5G: २२ हजाराचा मोबाईल १ हजारात खरेदी करण्याची संधी; वाचा नेमकी ऑफर काय आहे?

ऑफलाइन व्हिडीओ पाहण्यासाठी तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त नेटफ्लिक्स अॅपवर जावे लागेल आणि मेनूमध्ये तुम्हाला डाउनलोड केलेल्या व्हिडिओ दिसतील. येथे आपण सर्व डाउनलोड व्हिडीओ पाहू शकतो. 

डाउनलोडचा पर्याय तुम्हाला फक्त नेटफ्लिक्सकडून दिला जात नाही. हे फिचर तुम्हाला प्रत्येक अॅपवर दिलेले असते. तुम्ही ते मोफत व्हिडीओ पाहण्यासाठी वापरू शकता. या पर्यायाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही मोबाईलवरील इंटरनेट वाचवू शकता. 

Web Title: netflix watch free web series movie without using internet wifi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.