नेटगिअरचा उच्च श्रेणीतील वाय-फाय राऊटर
By शेखर पाटील | Published: May 30, 2018 01:21 PM2018-05-30T13:21:19+5:302018-05-30T13:21:19+5:30
नेटगिअर कंपनीने खास गेमर्ससाठी विकसित केलेल्या फ्लॅगशीप अर्थात उच्च श्रेणीतील राऊटर बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे.
बहुतेक गेममध्ये वाय-फायची आवश्यकता असते. याला नियमित वाय-फायपेक्षा गतीमान नेटवर्क आवश्यक असते. नेमकी हीच बाब लक्षात घेत नेटगिअरने नाईटहॉक प्रो गेमींग वाय-फाय राऊटर (एक्सआर-५००) लाँच केला आहे. याला ग्राहकांसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीत उपलब्ध करण्यात आले आहे. यामध्ये ड्युअल कोअर प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. तसेच यात अतिशय उच्च दर्जाचे चार अँटेना देण्यात आले आहेत. याच्या मदतीने गेमर्सला वाय-फाय नेटवर्कचा वापर करता येणार आहे. हे नेटवर्क अतिशय गतीमान तर आहेच पण ते सुरक्षितदेखील असेल असे नेटगिअरने नमूद केले आहे. विशेष म्हणजे यात मल्टीपल डिव्हाईसेसचा वापर केला तरी गतीमान नेटवर्क मिळणार असल्याचा दावादेखील करण्यात आला आहे.
नेटगिअर नाईटहॉक प्रो गेमींग वाय-फाय राऊटर (एक्सआर-५००) या मॉडेलचे मूल्य २३,००० रूपये असून ग्राहकांना ते कंपनीच्या अधिकृत शॉपीजसह ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहे.