मोबाईलचं नेटवर्क होईल दुप्पट! कधीच कट होणार नाही कॉल, आवाज येईल स्पष्ट आणि नेटही सुपरफास्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 08:15 PM2022-01-10T20:15:53+5:302022-01-10T20:16:07+5:30
Network Booster Sticker: एक खास स्टिकर ऑनलाइन विक्रीसाठी आला आहे. हा स्टिकर मोबाईलचं नेटवर्क बूस्ट करतो, असा दावा करण्यात आला आहे.
स्मार्टफोन कितीही महागडा असो किंवा त्यात कितीही चांगले स्पेक्स असो जर त्याला नेटवर्क नसेल तर तो फोन बऱ्याचदा निरुपयोगी ठरतो. अनेक लोकांच्या खोलीत, घरी किंवा परिसरात नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे कॉल लागत नाही किंवा मेसेजेस देखील पाठवता येत नाहीत. ही समस्या अनेकांना भेडसावते आणि यावर उपाय देखील अनेक कंपन्या शोधत आहेत. आता एक स्टिकर ऑनलाइन विकला जात आहे. हा स्टिकर फोनचं नेटवर्क बूस्ट करतो, असा दावा करण्यात आला आहे.
Network Booster Sticker
हा नेटवर्क बूस्टर स्टिकर स्मार्टफोनवर लावला जातो. दिसताना हा एखाद्या शोभेच्या स्टिकर प्रमाणे दिसतो, परंतु यात एक खास चिप असल्याचं प्रोडक्ट डिस्क्रिप्शनमध्ये सांगण्यात आलं आहे. ही चिप स्मार्टफोनमध्ये सिग्नल बूस्ट करण्यास मदत करते, असं देखील सांगण्यात आलं आहे. तुम्हाला फक्त हा स्टिकर फोनच्या मागे चिटकवायचा आहे. त्यानंतर कॉल किंवा मेसेज करताना या स्टिकरचा परिणाम दिसून येईल.
Network Booster Sticker ची किंमत
या स्टिकरची किंमत 1000 रुपयांच्या आत आहे आणि अनेक ई-कॉमर्स वेबसाईटवर हा विक्रीसाठी आला आहे. याची उपयुक्तता किती आहे किंवा प्रोडक्ट डिस्क्रिप्शनमध्ये केलेल्या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, हे मात्र सांगता येत नाही. परंतु ऑनलाईन हा स्टिकर चर्चेचा विषय ठरला आहे. तुम्ही वापरला आहे का असा स्टिकर? तुमचा अनुभव आम्हाला नक्की कळवा.
हे देखील वाचा:
Flipkart Sale: 28 हजारांत iPhone तर 7 हजारांत अँड्रॉइड; 10 स्मार्टफोनवर मिळतायत ढासू ऑफर
प्रतीक्षा संपली! भारतात आला पॉवरफुल Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन; वनप्लसला सडेतोड उत्तर