स्मार्टफोन अलर्ट! "हे" 7 अ‍ॅप्स चुकूनही करू नका डाऊनलोड अन्यथा होईल लाखोंचं नुकसान; वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2021 04:34 PM2021-01-08T16:34:42+5:302021-01-08T16:47:43+5:30

Never Download 7 Apps : लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर केला जातो. मात्र याच दरम्यान आता कस्टमर केयर स्कॅम आता समोर आला आहे.

never download these 7 apps on your android phone to avoid scams and bank fraud | स्मार्टफोन अलर्ट! "हे" 7 अ‍ॅप्स चुकूनही करू नका डाऊनलोड अन्यथा होईल लाखोंचं नुकसान; वेळीच व्हा सावध

स्मार्टफोन अलर्ट! "हे" 7 अ‍ॅप्स चुकूनही करू नका डाऊनलोड अन्यथा होईल लाखोंचं नुकसान; वेळीच व्हा सावध

Next

नवी दिल्ली - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर केला जातो. मात्र याच दरम्यान आता कस्टमर केयर स्कॅम आता समोर आला आहे. यामध्ये लोक गुगलवर संबंधित कंपनीचे कस्टमर केयर नंबर सर्च करतात. त्यांना फोन करतात. त्यानंतर थोड्याच वेळात त्यांच्या अकाऊंटमधून पैसे गायब होतात. अशा घटना रोज देशात ऐकायला मिळतात. गुगल सर्चमध्ये कस्टमर केयरचा नंबर सर्च करताना नेहमी पहिला रिझल्ट हा फेक नंबर असतो. मात्र सर्वसामान्य लोकांना यासंबंधीची माहिती नसते. 

गुगलवर नंबर मिळाल्यानंतर लोकांना खऱ्या कस्टमर केयरला फोन लावला आहे असं वाटतं. पण जास्तीत जास्त लोकांना फेक कस्टमर केयरशी नव्हे तर एका फ्रॉड कॉलशी संपर्क केलेला असतो. कस्टमर केयर फ्रॉड मध्ये सर्वात मोठे शस्त्र म्हणजे रिमोट कंट्रोलचे अ‍ॅप आहे. सायबर गुन्हेगार म्हणजेच फेक कस्टमर केयरचे लोक या मेसेजमधून एक लिंक पाठवत असतात. ज्यातून त्यांना रिमोटचा अ‍ॅक्सेस मिळत असतो. कोणताही अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर त्याचा संपूर्ण अ‍ॅक्सेस फ्रॉडच्या हातात जातो. 

एक अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर तुमची फसवणूक करणाऱ्यांच्या फोनमध्ये स्क्रीन रेकॉर्डिंग सुरू होते. यानंतर यूपीए लॉगिन करण्यास सांगितले जाते. यानंतर ते ओटीपी सुद्धा पाहून घेतात. रिमोट कंट्रोलचे हे अ‍ॅप मेलवेयर अ‍ॅप नसतात. काही जण त्याचा चुकीचा फायदा उचलतात. कोणतीही कंपनीचे कस्टमर केयर सपोर्ट कधीही रिमोट कंट्रोलचे अ‍ॅप डाउनलोड करण्यास सांगत नाहीत हे नेहमी लक्षात ठेवा.

"हे" अ‍ॅप चुकूनही आपल्या स्मार्टफोनमध्ये करू नका डाऊनलोड 

1. TeamViewer QuickSupport

2. Microsoft Remote desktop

3. AnyDesk Remote Control

4. AirDroid: Remote access and File

5. AirMirror: Remote support and Remote control devices

6. Chrome Remote Desktop

7. Splashtop Personal- Remote Desktop

 

Web Title: never download these 7 apps on your android phone to avoid scams and bank fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.